युगधर्म पब्लिक स्कूलचा "स्वच्छता मॉनिटर" चा वॉच*

 *निष्काळजीपणे कचरा टाकणाऱ्या वर युगधर्म पब्लिक स्कूलच्या   "स्वच्छता मॉनिटर" चा वॉच*



  जनोपचार the real news खामगाव

आज दिनांक 14 ऑक्टोबर शुक्रवार रोजी  धर्म पब्लिक स्कूलच्या विद्यार्थीरूपी स्वच्छता मॉनिटर यांनी   प्रभात फेरी आयोजित करून जनजागृती केली  .

 सदर प्रभातफेरी ची सुरवात सकाळी  9.30 ला  अर्जुन जलमंदिर जवळून करण्यात आली.  स्वच्छ भारत मिशन च्या वर्धापन दिनानिमित्त तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून शालेय शिक्षण विभाग यांच्या वतीने प्रोजेक्ट लेट्स चेंज हा उपक्रम राबविण्यात येत आहे.बुलढाणा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत हा उपक्रम जिल्हाभर मोठ्या प्रमाणात इयत्ता 5 वी ते 8वी च्या विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर म्हणून जबाबदारी स्वीकारत सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.कचऱ्याची निष्काळजीपणे विल्हेवाट लावणार्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून त्यांना या सवयीपासून परावृत्त करणे हा या मागचा मुख्य हेतू आहे. सदर प्रभातफेरीचि  सुरवात मा. तहसीलदार श्री पाटोळे  ,नायब तहसिलदार श्री हेमंत पाटील, श्री खरात सर, स्वच्छता जिल्हा समन्वयक श्री बोरसे  ,श्री वाघ  संस्थाध्यक्ष श्रीगोपाल अग्रवाल  त्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले .  सदर रॅलीमध्ये  विद्यार्थ्यांनी ओला कचरा आणि सुका कचरा बाबत माहिती सादर करताना पथनाट्याचे सुंदर सादरीकरण केले  .प्रभातफेरीमध्ये विद्यालयाचे   विद्यार्थी  आदर्श काचकुरे  आणि रुद्र इंगळे यांनी अनुक्रमे महात्मा गांधी आणि गाडगेबाबांची वेशभूषा परिधान केली होती. विद्यालयाच्या सर्व स्वच्छता मॉनिटर यांनी  रॅली  दरम्यान उपस्थित सर्व फेरीवाल्यांना  पेपर बॅग चे वितरण करून प्लास्टिक बॅग न वापरण्याचा आणि त्यांच्याकडील कचर्याची व्यवस्थित विल्हेवाट करण्याविषयी माहिती देताना  स्वच्छता मॉनिटरने विशेष भूमिका पार पाडली  . प्रभात फेरीदरम्यान उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान  विद्यालयाचे   समस्त संचालक मंडळही आवर्जून उपस्थित होते.  

महाराष्ट्र शासनाच्या लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटर या प्रोजेक्टसंदर्भात  प्रकल्प राज्य समन्वयक श्री रोहित आर्या सर  यांचे  विशेष मार्गदर्शन लाभले     बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा.भाग्यश्री विसपुते मॅडम,शिक्षणाधिकारी(प्राथ) मा.किशोर पागोरे साहेब,शिक्षणाधिकारी (माध्य) मा.प्रकाश मुकुंद साहेब ,खामगाव गटशिक्षणाधिकारी श्री खरात सर  यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा समन्वयक श्री.मंगेश भोरसे,श्री ईश्वर वाघ हे काम करत आहे.

स्वच्छता  प्रभात  फेरीदरम्यान खामगाव पोलिस प्रशासनाकडून विशेष सहकार्य लाभले. 

 स्वच्छता मॉनिटर्स ला कार्य करण्यासाठी विद्यालयाचे स्वच्छता समन्वय श्री शिवाजी वाघमारे व प्राचार्य भाग्यश्री देशमुख यांनी मोलाचे मार्गदर्शन केले .सदर प्रभातफेरी तसेच स्वच्छतेविषयी समाजप्रबोधन निमित्त आयोजित  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालय असेल सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचा यांनी यशस्वी   प्रयत्न केले.

Post a Comment

أحدث أقدم