प्रा. गुंजकर सरांचा नवा पॅटर्न; पहिली पासूनच विद्यार्थ्यांना एमपीएससी यूपीएससीचे शिक्षण

 जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलरचे विद्यार्थी गिरवत आहेत स्पर्धा परीक्षांचे धडे

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क - शैक्षणिक क्षेत्रात नवे आयाम स्थापित करणाऱ्या प्राध्यापक रामकृष्ण गुंजकर सरांनी आपल्या जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलरमध्ये आणखी नवा पॅटर्न राबविण्यास सुरुवात केली आहे. जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलरमधील विद्यार्थी पहिली पासूनच  एमपीएससी- यूपीएससीचे धडे गिरवत आहेत. सदर शाळेत दर शनिवारी पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थांना स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करण्यात येत असून १०० गुणांचा सब्जेक्टिव्ह पेपर देखील घेण्यात येत आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी ही जिल्हातील पहिली शाळा ठरली आहे.

Advt.


    मिशन एमपीएससी - युपीएससी अंतर्गत जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर आणि गुंजकर कॉलेज आवार येथे  पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेने नवीन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत दर शनिवारी राष्ट्रगीत व झाल्यानंतर सर्व विद्यार्थीना ग्राउंडवर अंतरावर बसून जिल्ह्याचा इतिहास, भूगोल,पॉलिटिकल सायन्स, मॅथेमॅटिक्स, बेसिक सायन्स, सामान्य ज्ञान तसेच महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, भारताचा इतिहास,भूगोल, पॉलिटिकल सायन्स, आणि जगाचा इतिहास भूगोल, व पॉलिटिकल सायन्स याबाबत  विद्यार्थ्यांच्या वर्गानुसार  प्रश्पत्रिका  तयार करून विद्यार्थ्यांच्या वर्गवारी नुसार दर शनिवारी १०० प्रश्नाचा सब्जेक्टिव्ह पेपर घेण्यात येतो. अशा प्रकारे चार पेपर  झाल्यानंतर एमपीएससी- यूपीएससीच्या आणि नीट जे डबलइ च्या आधारावर ऑब्जेक्टिव्ह दर महिन्याला एक  टेस्ट घेतली जाते. जेणेकरून विद्यार्थ्यांना ओएमआर सीटची ओळख पहिल्या वर्गातच झाली तर ते विद्यार्थी दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन पर्यंत चांगल्या प्रकारे तयार होऊन भविष्यात आयएएस आयपीएस तसेच तहसीलदार शिक्षणाधिकारी डीवायएसपी अशा उच्चपदस्त पदावर विराजमान होतील, हा यामागचा  मुख्य उद्देश आहे,असे प्रा. रामकृष्ण गुंजकर यांनी सांगितले आहे. गुंजकर एज्युकेशन हब  वामन नगर खामगाव आणि स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक बहुउद्देशीय संस्थेचा हा नवीन उपक्रम प्रभावी ठरत असून याला पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमाची दखल बुलढाणा शिक्षण विभागानेही घेतली असून संस्थेच्या या चांगल्या उपक्रमाचे भरभरून कौतुक करत पाठिंबा दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post