गणेशभाऊ चौकसे मित्र मंडळाच्या वतीने रविवारी आरोग्य तपासणी शिबिर
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय जळगावची टीम येणार
खामगाव प्रतिनिधी: गणेशभाऊ चौकसे मित्र मंडळ व गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार ९ फेब्रुवारी रोजी भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन स्थानिक श्री मुक्तेश्वर आश्रम येथे सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. या आरोग्य तपासणी शिबिरासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालय यांची टीम येणार आहे. या आरोग्य तपासणी शिबिरात टूडीइको, इसीजी, कार्डिओग्राफ, रक्तदाब तपासणी, हृदयरोग, एनजीओग्राफी,एनजीओ प्लास्टि, नाक कान घसा, शस्त्रक्रिया, नेत्रालय, स्त्रीरोग, अस्थिरोग, जनरल मेडिसिन, त्वचारोग तसेच मानसोपचार आदी आजाराबाबत तपासणी केली जाईल. रुग्णांनी नाव नोंदणीसाठी गणेशभाऊ चौकसे ८८८८२०८३३०, दीपक महाजन ८८८८३६२८८२, रत्नाकर जोशी ९८२२९६८००५, बबलू भाई कादरी ९६०४११९९८४,राजू घट्टे ९८८१३१४९४८, रमेश गवारगुर ९७६३९९२३१३,कौशल खेतान ९४०५४७८८९५ यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन गणेशभाऊ चौकसे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
![]() |
Advt. |
Post a Comment