संस्कार भारती बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने ‘मी अहिल्या’ चे भव्य आयोजन

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : हे वर्ष संपूर्ण देश पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची त्रीजन्मशताब्दी साजरी करीत आहे. संस्कार भारती च्या वतीने संपूर्ण देशात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन चरित्रावर विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्या अंतर्गत संस्कार भारती बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने बुधवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता खामगाव येथील कोल्हटकर स्मारक मंदिरात प्रा.सौ.विद्याताई कावडकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व टिळक स्मारक महिला मंडळ, खामगाव द्वारे सादरीकरण करीत असलेल्या   ‘मी अहिल्या’ या नाट्यरुपी  पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे आत्मनिवेदन भव्य प्रमाणात आयोजित केले आहे. तसेच नाट्य शास्त्राचे रचनाकार भरत मुनी यांची जयंती यावेळी साजरी करण्यात येणार आहे.

advt.

तरी या कार्यक्रमाला जास्तीतजास्त रसिकांनी, नागरिकांनी उपस्थित रहावे व स्थानिक कलाकारांचा उत्सव वाढवावा असे आवाहन संस्कार भारती बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post