युगधर्म पब्लिक स्कूलच्या खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी!

IMF मार्शल आर्ट्स नॅशनल चॅम्पियनशिप 2025 मध्ये पदकांची लयलूट

खामगांव :- देशभरातील कुशल खेळाडूंमध्ये आपले कौशल्य सिद्ध करत युगधर्म पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी 24व्या राष्ट्रीय स्तरावरील IMF मार्शल आर्ट्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये आपली चमकदार उपस्थिती नोंदवली. अत्यंत चुरशीच्या स्पर्धांमध्ये भाग घेत या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.अर्णव देशमुख याने चार वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत एकूण चार पदके पटकावली. त्याने स्पारिंग (फाइट) आणि काता या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत २ सुवर्णपदके (गोल्ड मेडल्स) जिंकली, तर कंटिन्युअस पंचेस आणि स्टार जंप या स्पर्धांमध्ये अप्रतिम खेळ करत २ रौप्यपदके (सिल्व्हर मेडल्स) मिळवली.

Advt.

तसेच कैवल शेळके याने देखील आपली ताकद आणि कौशल्य सिद्ध करत सुवर्णपदक जिंकले. अक्षदा गवळी हिने देखील आपल्या दमदार कामगिरीने गोल्ड मेडल मिळवत शाळेच्या क्रीडाक्षेत्रातील परंपरेला न्याय दिला.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष श्री गोपालजी अग्रवाल, मुख्याध्यापकांनी श्री. यशवंत बोदडे, क्रीडा प्रशिक्षकांनी आणि पालकवर्गाने भरभरून कौतुक केले. कठोर मेहनत, आत्मशिस्त आणि जिद्द यांच्या जोरावर या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post