श्री संत रोहिदास महाराज जयंती निमित्त विवीध कार्यक्रमाचे आयोजन

खामगाव:-जनोपचार न्यूज नेटवर्क:-  श्री संत रोहिदास महाराज जयंती उत्सवा समितीच्या वतीने श्री संत रोहिदास महाराज जयंती उद्या दिनांक 12 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे  सर्वप्रथम सकाळी 9 वाजता चादमारी येथील रोहिदास महाराज मंदिर येथे आरती  करण्यात येईल त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून रोहिदास मठ येथून पालखी निघणार आहे.पालखीमध्ये वारकरी टाळकरी रथ राहणार असून शहरातील प्रमुख मार्गाने शोभायात्रा काढण्यात येणार आहे हे. शोभा यात्रेचा समारोप चादमारी येथील संत रोहिदास महाराज मंदिर येथे होणार असून तेथे महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे .तरी शोभायात्रेमध्ये सर्व समाज बांधव मित्रमंडळी माता भगिनी यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन श्री संत रोहिदास महाराज उत्सव समिती खामगाव यांनी केले आहे. 

शोभा यात्रेचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळापासून अर्जुन जलमंदिर मेन रोड जगदंबा चौक,पोलीस स्टेशन,गुरुद्वार,आंबेडकर पुतळा नगर परिषद,टर्निंग ,टिळक पुतळा विकमची चौक चादमारी चौक येथून मंदिर येथे समारोप होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post