अतिवृष्टी,ढगफुटीमुळे खरडून गेलेल्या शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी: शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांची मागणी.
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- ७ व ८ जुलै २०२४ रोजी तालुक्यातील पिंप्री गवळी,कोलोरी,आवार, कारेगाव हिंगणा,निळेगाव शिर्ला नेमाने सह खामगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी,ढगफुटी,पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे.परंतु त्यांना जमीन खरडूनची अद्याप पर्यंत कोणतीही मदत मिळाली नाही त्यामुळे या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी खामगाव शिवसेना प्रमुख राजेंद्र बघे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन द्वारे राज्य सरकारकडे मागणी केली आहे.
वरील निवेदनानुसार ७ व ८ जुलै २०२४ रोजी मौजे पिंप्री गवळी, कोलोरी,आवार येथे झालेल्या अतिवृष्टी, ढगफुटी, पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, तुर, केळी, कपाशी या पिकांसह शेतातील स्प्रीकलर पाईप, ठिंबक नदीच्या पुरामध्ये वाहून गेले असून त्याच बरोबर जमिनीचे बांध फुटुन जमिनी खरडुन गेल्या आहेत तसेच शेतातील विहिरी बुजुन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. याबाबत प्रशासनाकडून सर्व्हे सुध्दा झालेले आहेत.
परंतु अद्याप पावेतो आमच्या माहिती प्रमाणे खरडून च्या पंचनाम्याच्या यादया तहसिल कार्यालयातच पडून आहेत. करीता शासन दरबारी शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या झालेल्या पंचनाम्याच्या यादया पाठवून शेतक-यांचे झालेले शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी.
असे निवेदन देण्यात आले आहे या निवेदनावर तालुका प्रमुख राजेंद्र बघे,शहर प्रमुख चेतन ठोंबरे, शिवसेनेचे डॉक्टर संतोष तायडे,महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख सौ कावेरीताई वाघमारे,महिला आघाडी शहर प्रमुख सौ वैशाली घोरपडे,महिला आघाडी उप तालुकाप्रमुख ज्योतीताई बुजाडे, वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुख आनंद सांरसर,उपतालुकाप्रमुख विष्णूदास कदम,अनुसूचित जाती जमाती तालुका प्रमुख प्रकाश हिवराळे,उप तालुकाप्रमुख संतोष दुतोंडे,मा. सरपंच जनार्दन मोरे,मंगेश इंगळे,चेतन शेलकर, श्रीहरी टिकार, अनंत केने,अरुण बंड,श्रीधर टिकार,राजेश टिकार, प्रमोद गासे,पियुष तवर,शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
Post a Comment