नव संकल्प ग्रुपच्या वतीने पुलवामा हल्ल्यातील शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली: ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी वाहिली आदरांजली !
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क.-१४ फेब्रुवारी २०१९ रोजी दहशतवाद्यांनी पुलवामा येथे केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आज खामगाव येथील नव संकल्प ग्रुपच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात यावेळी सर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी देखील शहीद जवानांना आदरजलीहा वाहिली.
सहा वर्षांपूर्वी याच दिवशी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय निमलष्करी दलाचे ४० जवान शहीद झाले ही घटना संपूर्ण देशवासियांसाठी धक्कादायक ठरली होती ! आज नव संकल्प ग्रुप ने शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली यावेळी खामगाव प्रेस क्लबचे उपाध्यक्ष तथा जनोपचार न्यूज नेटवर्कचे संपादक नितेश मानकर,नव संकल्प ग्रुप चे वैष्णवी गोलाईत,जया भोजने ,भूमी आसोडे ,दीक्षा सुरवाडे ,मनीषा पाटोळे,संतोष साळुंखे, आनंद लोखंडे,आनंद शेळके, सचिन ससाने,सुमेत गावंडे, सौरभ मिसाळ,आदर्श सावदेकर, सुरज जाधव,बंटी गव्हांदे आदींनी श्रद्धांजली अर्पण केली.
वेस्ट कार्ड बोर्ड पासून कु.भूमी ने साकारले शहीद प्रतिबिंब!
टाकाऊ वस्तु पासून आपण टिकाऊ आणि आकर्षक निर्माण करू शकतो हे कु.भूमी रवी आसोडे हीने सिद्ध केलं. तिने टीव्हीचा खोका म्हणजेच वेस्ट कार्डबोर्ड पासून शहीद प्रतिबिंब बनवले. हेच ते प्रतिबिंब
Post a Comment