*उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा*
बुलढाणा (जिमाका), दि. ५ : राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे रविवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
त्यांच्या दौऱ्यानुसार उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे सकाळी १० वाजता सिद्धीविनायक टेक्नीकल कॅम्पस, खामगांव येथील हेलिपॅड येथे आगमन होईल. सकाळी १०.२० वाजता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, खामगांव येथे आगमन व सकाळी १०.४० वाजता नूतन जिल्हा व अतिरिक्त न्यायालय तसेच दिवाणी व फौजदारी न्यायालय इमारतीच्या कोनशिला समारंभास उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी ११.१५ वाजता खामगांव येथील डॅा. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन/लोकार्पण करतील. दुपारी १२.३० वाजता खामगांव येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.
00000
Post a Comment