श्री अग्रसेन जयंती महोत्सव विविध कार्यक्रमाने संपन्न

खामगाव महाराजा श्री अग्रसेन यांची ५१४९ वी जयंती यावर्षी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दि.२७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोंबर पर्यंत श्री अग्रसेन जयंती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन श्री अग्रसेन भवन, बालाजी प्लॉट खामगाव येथे करण्यात आले होते. महाराजा अग्रसेन जयंतीनिमित्त सुरूवातीलाच मोठ्या प्रमाणात शहरात आतिषबाजी करण्यात आली.

श्री अग्रसेन जयंती समारोह श्री सुभाषजी द्वारकादासजी चौधरी प्रसिध्द उद्योगपती संचालक अमित कॉट फायबर मलकापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत तर सत्कारमुर्ती नविन भव्य अग्रसेन भवन निर्माण करीता भुमी दानकर्ता श्री आकाशजी श्यामजी अग्रवाल आश्यागो खामगांव हे होते. श्रीमती प‌द्मावती कैलासचंदजी अग्रवाल अध्यक्षा जयंती समारोह २०२४ यांच्या अध्यक्षतेत, तसेच अग्र ध्वजारोहण श्री डॉ. गोकुलचंदजी शंकरलालजी झुनझुनवाला यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. श्री मनोजजी मधुसूदनजी अग्रवाल अध्यक्ष श्री अग्रसेन जयंती उत्सव समिती २०२४, श्री सुरज बजरंगलालजी अग्रवाल अध्यक्ष श्री अग्रसेन भवन मंडळ खामगांव यांच्या अध्यक्षतेत श्री अग्रसेन जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आयेजीत रक्तदान शिबीरामध्ये ५१ समाजबांधवांनी रक्तदान केले.

श्री अग्रसेन जयंती महोत्सवा दरम्यान स्विमींग स्पर्धा, अग्र वुमन्स प्रिमीअर लिग क्रिकेट स्पर्धा, सांस्कृतीक कार्यक्रमात एकल नृत्य स्पर्धा, ग्रुप डांस चे आयोजन करण्यात आले आहे. रंगभरो स्पर्धा, चेस स्पर्धा, ओपीएल अग्र प्रिमीअर लिग बॉक्स क्रिकेट स्पर्धा, हेल्दी बेबी स्पर्धा, तोरण बनाओ स्पर्धा, गमला बनाओ स्पर्धा, शिवलिंग बनाओ स्पर्धा, मेट्रो डान्स स्पर्धा, रंगोली बनाओ स्पर्धा, डायट सलाद स्पर्धा, टेंटु बनाओ स्पर्धा, रिल्स बनाओ स्पर्धा स्टेज शो, कॉमेडी सर्कस, हाऊजी हंगामा, बॅडमिंटन स्पर्धा इत्यादी विविध स्पर्धेचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. त्योबतच साइबर क्राईम सिक्युरिटी सेमिनारचे व आनंद मेलाचे सुध्दा आयोजन करण्यात आले होते. विजयी स्पर्धकांना विविध पारितोषीकांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.


यावेळी शहरातून भव्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महाराजाधिराज श्री अग्रेसनजी यांची शोभायात्रा अग्रसेन भवन शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली होती. यावेळी अग्रवाल समाजातील समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती व शोभायात्रेचे शहरात जागोजागी आतिषबाजी व स्वागत करण्यात आले.


या प्रसंगी अग्रसेन जयंती उत्सव समिती २०२४ अध्यक्ष मनोज मधुसूदनजी अग्रवाल, श्री अग्रसेन भवन मंडळाचे अध्यक्ष सुरज बजरंगलालजी अग्रवाल, अग्रवाल युवक मंडळाचे अध्यक्ष अंकीत संतोषजी डिडवाणीया, अग्रवाल महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पद्मा दिनेशजी सुरेका, अग्रवाल बहुबेटी मंडळाचे अध्यक्ष सो. कविता प्रेमजी अग्रवाल, श्री अग्रसेन स्मारक समितीचे पदाधिकारी यांच्यासह श्री अग्रसेन भवन मंडळाचे अध्यक्ष सुरज अग्रवाल, महिला मंडळाचे पदाधिकारी व युवक मंडळाचे पदाधिकारी, श्री अग्रवाल बहुबेटी मंडळाचे पदाधिकारी तसेच अग्रवाल समाजातील महिला व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


नविन भव्य अग्रसेन भवन निर्माण करीता भुमी दानकर्ता श्री आकाशजी श्यामजी अग्रवाल आश्यागो खामगांव यांचे स्मृतिचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी राजेश अग्रवाल खेर्डावाले, अमीत गोयनका, श्री अग्रसेन भवन मंडळाचे अध्यक्ष सुरज बजरंगलालजी अग्रवाल, सचिव दिनेश अग्रवाल, अग्रसेन जयंती उत्सव समिती २०२४ अध्यक्ष मनोज मधुसूदनजी अग्रवाल, अग्रवाल युवक मंडळाचे अध्यक्ष अंकीत संतोषजी डिडवाणीया हे उपस्थित होते. तर मंचावर सो. कविता अग्रवाल, सौ. पदमा सुरेका, श्रीमती पदमा कैलासजी अग्रवाल, सौ. संगीता चौधरी मलकापूर यांची उपस्थिती होती.


वरील कार्यक्रमाचे आयोजन श्री अग्रसेन भवन मंडळ, श्री अग्रवाल युवक मंडल, श्री अग्रवाल महिला मंडळ, श्री अग्रवाल बहूबेटी मंडल, श्री अग्रसेन जयंती उत्सव समिती २०२४, श्री अग्रसेन स्मारक समिती द्वारे करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सुत्र संचालक सौ. सरिता अजय अग्रवाल, सौ. खुशबु हरीष अग्रवाल तर आभार प्रदर्शन अंकीत डिडवाणीया यांनी केले. वरील माहिती प्रसिध्दी प्रमुख राजकुमार गोयनका यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post