अग्रवाल युवक मंडळाची कार्यकारणी जाहीर

 अध्यक्ष अंकीत  डिडवाणीया, सचिव आदित्य  डिडवाणीया यांची निवड

खामगाव -जनोपचार न्यूज नेटवर्क :-  सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारी अग्रवाल युवक मंडळाच्या सदस्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली. बैठकीमध्ये २०२४-२५ करीता अग्रवाल यूवक मंडळाची नुतन कार्यकारणी गठीत करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी अंकित संतोषजी डिडवाणीया, उपाध्यक्ष साकेत राजकुमार गोयनका, उपाध्यक्ष कपिल योगेश धानुका, सचिव आदित्य विनोदकुमार डिडवाणीया, सहसचिव अनुज गोविंद चुडीवाले, कोषाध्यक्ष शिवकुमार कैलाश खेर्डावाला,सहकोषाध्यक्ष आयुष संतोष मोदी, सोशल मीडिया प्रमुख अमर गोपाल अग्रवाल, सलाहकार गौरव राजेंद्र टिबडेवाल, सी.ए. आनंद नारायणदास सुरेका, शैलेश घनश्याम गुप्ता, आदित्य रवि केडीया, अनुरोध रविंद्र खेतान यांचे उपस्थित अग्रवाल युवक मंडळाची निवड करण्यात आली.



Post a Comment

Previous Post Next Post