खामगाव सामान्य रुग्णालयाचे श्रेणी वर्धन; आता 300 खाटांचे होणार: आरोग्य मंत्र्यांची मान्यता
आमदार आकाशदादा फुंडकर यांच्या प्रयत्नांना यश
खामगाव: जनोपचार न्यूज नेटवर्क :- खामगाव सामान्य रुग्णालयाचे श्रेणी वर्धन लवकरच होणार असून आता हे रुग्णालय 300 खाटांचे होणार आहे. आरोग्य मंत्र्यांची याला मान्यता मिळाली असून यासाठी आमदार आकाशभाऊ फुंडकर यांनी सतत केलेले प्रयत्न यशस्वी ठरले आहे.
आमदार आकाश फुंडकर यांनी यासाठी मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कडे सतत पाठपुरावा करून भरपूर प्रयत्न केले. २०० खाटांचे खामगाव सामान्य रुग्णालय मध्ये खामगाव, जळगाव, संग्रामपूर, शेगाव या तालुक्यातील हजारो रुग्ण उपचार साठी येतात. मात्र २०० खाटांचे हे रुग्णालय अपुरे पडत असून आरोग्य कर्मचारी देखील कमी पडतात. ही बाब लक्षात घेऊन खामगाव रुग्णालय चे श्रेणी संवर्धन करून ते 300 खाटांचे करण्याची आग्रही मागणी आमदार आकाशभाऊ फुंडकर यांनी राज्य शासन, आरोग्य मंत्रालय यांच्याकडे रेटली. यासाठी वारंवार शासन स्तरावर पाठपुरावा केला. तसेच त्यांच्या पुढाकाराने आरोग्य उप संचालक ( अकोला) , संचालक यांनी तसा प्रस्ताव आरोग्य मंत्री , सचिवालयकडे पाठविला.याला राज्य शासन आणि आरोग्य मंत्री यांनी मान्यता दिली आहे. तसे पत्र आमदार फुंडकर, उप संचालक, जिल्हाधिकारीकिरण पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक भागवत भुसारी यांना प्राप्त झाले आहे. तसेच विस्तारित बांधकाम आणि अन्य कामासाठी लवकरच स्वतंत्र शासकीय निर्णय काढण्यात येणार असून ही कामे लवकरच सुरू होणार आहे. यामुळे खामगांव मतदार संघासह घाटाखालील ५/६ तालुक्यातील रुग्णांना देखील याचा फायदा होणार आहे.
Post a Comment