डॉ. अण्णाभाऊ साठे यांचा प्रबोधनात्मक व भव्य मिरवणूक रॅली जयंती महोत्सव संपन्न
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :-लोखंडा गावात दरवर्षीप्रमाणे साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांचा जयंती महोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजक अनंता भाऊ सकळकळे लहुजी शक्ती सेना ता. अध्यक्ष खामगांव यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्रीकृष्ण भाऊ ठाकरे ग्रामपंचायत सरपंच लोखंडा तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक मा. श्री विलास भाऊ भागवत उपसरपंच ग्रामपंचायत लोखंडा यांनी जबाबदारी स्वीकारली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन भाऊ सकळकळे तसेच कार्यक्रमाचे प्रस्ताविक संजय पाटोळे सर लहुजी शक्ती सेना युवा तालुका अध्यक्ष खामगांव यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून डॉ. संतोष हटकर उपसरपंच शिराळा यांनी आपल्या भाषणातून डॉ. अण्णाभाऊ साठे यांची स्वाभिमानाची लढाई व शोषित पीडित कष्टकरी शेतकऱ्यांची व्यथा आपल्या भाषणातून कणखरपणे मांडली.
भाषणे व सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाल्यावर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचा भव्य रथ रॅली मिरवणूक लोखंडा गावातून ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आला. यावेळी थोर महापुरुषांच्या जयजयकार घोषणा करण्यात आल्या. यावेळी एकनाथजी हिवराळे, मनोज हेलोडे, सुरज हिवराळे, प्रकाश पुंडे, गोविंदा आटोळे, तुळशीराम बाभुळकर, महादेव चंदनशिव, रामदास जाधव, फकीरा कांबळे, अभि वानखडे, ज्ञानेश्वर पवार, जोगेंद्र हिवराळे,राहुल हिवराळे, रवी हिवराळे, जगन्नाथ हिवराळे, समस्त लहुजी मित्र मंडळ व माता भगिनी व समस्त लोखंडा गावकरी मंडळी उपस्थित होते.
Post a Comment