विश्वबंधुत्वाची भावना मानव मनात रुजवणार व्यक्तिमत्व - दादी प्रकाशमनिजी 

जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव :- स्थानीय प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा रायगड कॉलनी या ठिकाणी आज २५ ऑगस्ट रोजी ब्रह्माकुमारी संस्थेच्या पूर्व संचालिका परम श्रद्धेय दादी प्रकाशमनीजी यांचे 17 वे पुण्यस्मरण साजरे करण्यात आले 

याप्रसंगी ब्रह्माकुमारी केंद्राच्या नियमित विद्यार्थ्यांनी सकाळी सात ते आठ ईश्वरीय महावाक्याचे श्रवण केले त्यानंतर परमात्म्याला भोग अर्पण करण्यात आला याप्रसंगी सेवा केंद्र संचालिका शकुंतला दीदी यांनी दादीप्रकाशमनिजी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तेव्हा त्या म्हणाल्या दादी प्रकाशमनी जी यांनी ब्रह्माकुमारी या विश्वव्यापी संस्थेचे सुचारू रूपाने संचालन केले, आज विश्वामध्ये हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई  हम सब है भाई भाई असे नारे लागत असूनही आपसात भांडण, तंटे,अशांतीचे साम्राज्य पसरलेले आहे. आपण शरीराला चालवणारी एक चेतन सत्ता आत्मा ह्या रूपाने ईश्वराची संतान आहोत. गॉड, अल्लाह ,ईश्वर अशा वेगवेगळ्या नावांनी आपण  ईश्वराला हाक मारतो तो ईश्वर सर्व आत्म्यांचा पिता या नात्याने आपण आपसामध्ये भाऊ भाऊ आहोत हा विश्वबंधुत्वाचा संदेश दादीप्रकाश मनीजी यांनी आपल्या जीवनाद्वारे दिला  आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी ब्रह्माकुमारी संस्था 25 ऑगस्ट ला विश्वबंधुत्व दिवस म्हणून साजरा करत येत आहे

याप्रसंगी डॉ. गणेश महाले, डॉ. मंजुश्री महाले, प्रोफेसर कमलेश कहर, सीमाताई ठाकरे सुषमा दीदी, दिव्या दीदी यांनी श्रद्धांजली अर्पण करून दीप प्रज्वलन केले. विश्वबंधुत्वाच्या भावनेचा शुभ संकल्प आपल्या मनामध्ये दृढ करून ब्रह्माकुमारी सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दादीप्रकाश मनी जी यांना  श्रद्धांजली अर्पण केली

Post a Comment

Previous Post Next Post