“माझे आंगण माझा अभिमान” या स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन
खामगांव दि.८ : जनोपचार न्यूज नेटवर्क - खामगांव नगर परिषदेतर्फे “माझे आंगण माझा अभिमान” या स्पर्धेत खामगांव शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक नगर परिषद डॉ.प्रशांत शेळके यांनी केले आहे.
खामगांव नगर परिषदेने "माझे आंगण माझा अभिमान” २०२४ ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्या अनुषंगाने पर्यावरणाशी निगडीत कार्यप्रणाली जसे की, सौरउर्जा वापर, वॉटर हार्वेस्टीग, वृक्षारोपण, शुन्य कचरा घरे इत्यादी वर आधारित माझे आंगण माझ अभिमान स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे १०,०००/-, ५०००/- व ३००० इतक्या रोख रकमेची पारितोषिके ठेवण्यात आलेली आहेत. या स्पर्धेची नोंदणी दि.९ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट २०२४ पर्यंत शासकीय सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत नगर परिषदेच्या भांडार विभागात नोंदणी करावी,अथवा संपर्क साधावा.असे आवाहन मुख्याधिकारी नगर परिषद डॉ.प्रशांत शेळके यांनी केले आहे.
Post a Comment