लोकसभा निवडणूक २०२४ निमित्त जागा वाटपावरून रस्सीखेच सुरु असताना बुलढाणा लोकसभा जागेसाठी शिंदे गटाचे विद्यमान खासदार प्रतापवर जाधव सुद्धा तिकिटाच्या वेटिंग लिस्ट मध्ये आहेत. दरम्यान भाजपाकडून बुलढाणा मतदार संघात चाचपणी सुरु असली तरी ऐनवेळी तिकीट प्रतापराव जाधव यांनाच मिळेल, असे राजकीय जाणकार सांगत आहेत.
बुलढाणा लोकसभेचे तीन टर्म खासदार असलेले खासदार प्रतापराव जाधव यांच्या नाराजीचा सूर असल्याच्या बातम्या स्थानिक दैनिकात येत आहेत. आहे नितीन नियमाप्रमाणे खासदार प्रतापराव जाधव हे निवडणुकीच्या तोंडावरतीच जिल्ह्यामध्ये दिसतात मात्र चार वर्षे ते आहेत की नाहीत अशी त्यांची कार्यपद्धती आहे असा सुद्धा आरोप केला जात आहे. खासदार प्रतापराव जाधव हे शिवसेना भाजपा युतीत तीन वेळा खासदार राहिले आहेत. त्यांना बुलढाणा लोकसभा निवडणूक 2019 मध्ये पाच लक्ष 21 हजार 977 मते त्यांना मिळालेली आहेत ते एक लाख 33 हजार 287 मताधिक्यांनी निवडून आलेले आहेत जळगाव जामोद मतदारसंघांमधून 92 हजार 944 मते त्यांना मिळाली या मतदारसंघामधून त्यांना 36 हजार 984 मतांचा लीड मिळाला होता खामगाव मतदारसंघांमधून 33 हजार 279 मतांचा लीड होता सन 2019 ला डॉक्टर राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादी यांना 3 लक्ष 88 हजार690 मते मिळाली, बळीराम सिरस्कार वंचित एक लक्ष 72 हजार 627 मते मिळाली होती.दरम्यान खासदार प्रतापराव जाधव आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सोडून बंडखोर शिंदे गटात सामील झाले आहेत. यावेळेस त्यांच्या उमेदवारीबाबत सांशकता आहे. तर ही जागा भाजपने घेतली तर आ. डॉ. संजय कुटे, आ. श्वेताताई महाले यांची नावे चर्चेत आहेत. महाविकास आघाडी कडून ठाकरे सेनेचे नरेंद्र खेडकर, काँग्रेसच्या जयश्रीताई शेळके यांना उमेदवारी मिळू शकते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे सुद्धा तयारीला लागले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातून दिल्लीची वारीचे तिकीट कोणाला मिळते हे मात्र लवकरच समोर येईल.
Post a Comment