खामगावात युवतींचे सेक्स व्हिडीओ व्हायरल; पालकांमध्ये चिंता
Sex video : बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात पुन्हा एकदा अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरण चर्चेत आले आहे. दरम्यान या प्रकरणामुळे पालक वर्गात चिंता व्यक्त होत आहे. खामगाव शहरात काही महिन्यापूर्वी प्रतिष्ठीत म्हणवून घेणाऱ्या काही व्यक्तीचे नको त्या अवस्थेत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान आता असेच काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओ मध्ये महाविद्यालयीन तरुणी सेक्स करताना, ऑनलाईन सेक्स चॅट करताना दिसत आहेत. प्रेमाच्या जाळ्यात ओढून कुणी विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीने या तरुणीचे व्हिडिओ काढले आहेत. मात्र या गंभीर घटनेनं संबंधित तरुणी आणि महिलांचे आयुष्य उध्वस्त होवू शकते याचा थोडा विचार सुद्धा विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीने केलेला नाही. दरम्यान पोलिसांनी असे व्हिडीओ कुणी व्हायरल केले तर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. तर जागरूक नागरिकांनी सुद्धा सेक्स व्हिडीओ व्हायरल करू नये असे आवाहन केले जात आहे.
मुली व महीलांनो काळजी घ्या
![]() |
आजकाल युवतींचे सेक्स व्हिडीओ फोटो काढून त्यांना ब्लँकमेल करण्याचा अनेक घटना वाढत आहेत. त्यामुळे मुलींनी काळजी घेणं गरजेचे आहे. आपल्या सोबत अशी काही घटना घडू नये याबाबत सतर्कता बाळगणे गरजेचे आहे |
Post a Comment