बिबट्याचा धाक आणि पाणीपुरवठा विस्कळीत...
खामगाव:- बिबट्याच्या मुक्त संचाराचा परिणाम थेट खामगावच्या पाणीपुरवठ्यावर झाला आहे. खामगाव शहराला पाणीपुरवठा करणारे गेरू माटरगाव धरण व तेथील नल योजना ही जंगल मय भागात आहे .सध्या या भागात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याने नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. त्यामुळे खामगाव नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने चक्क मेसेज नागरिकांना पाठवून पाणीपुरवठा बाबत माहिती दिली आहे ती अशी की,"गेरू माटरगाव येथील बिबट्याच्या धाकामुळे पंप सुरू करण्यात बाबत रात्री एक वाजे ऐवजी सकाळी ७ वाजता सुरू होत आहे व संध्याकाळी पंप उशिरा बंद करण्या ऐवजी पंप लवकर बंद होत आहे त्या मुळे दोन्ही टाक्या रात्री भरल्या जात नसल्या मुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे, त्या मुळे पाणी पुरवठा बाबत कोणतीही माहिती देता येणार नाही. जसे जसे पाणी उपलब्ध होईल तसे तसे गावातील पाणी पुरवठा घेण्यात येईल "🙏🏻
Post a Comment