शिवजयंतीदिनी अखिल भारतीय कवी सम्मेलन आयोजित
सुपरिचित स्वयंसेवी संगठन रोटरी क्लब खामगांवतर्फे रोटरी गतीमंद विद्यालय व रोटरी इंग्लिश स्कुल आणि इतर समाजपयोगी कार्याच्या सहाय्यार्थ १९ फेब्रुवारी २०२४ रोजी स्थानीक जे.व्ही. मेहता नवयुग विद्यालयाच्या (न्युईरा हायस्कूल) भव्य प्रांगणात अखिल भारतीय कवी सम्मेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यातून प्राप्त झालेले उत्पन्न गतीमंद मुलांचे शिक्षणाकरीता, गतीमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांचे व्होकेशनल प्रशिक्षणाकरीता व गतीमंद विद्यार्थ्यांना त्यांचे पायावर उभे करण्यास मदत करण्याकरीता वापरण्यांत येणार आहे.
रोटरी कविसम्मेलनात राष्ट्रीय स्तरावर विख्यात वीर/हास्य/श्रृंगार रस कवी शशिकांत यादव, गीतकार प्रियांशु गजेन्द्र, श्रृंगार रस कवयित्री सोनल जैन, हास्य व्यंग कवी दिनेश देसी घी आणि हास्य व्यंग कवी हिमांशु बवंडर हे श्रोत्यांचे मनोरंजन करणार आहेत. यामध्ये सर्वांना परवडेल अशा पद्धतीने प्लॅटिनम, गोल्ड व सिल्व्हर अशा ३ प्रकारच्या बैठक व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत. सोबत फूड झोनमध्ये नि:शुल्क खाद्यपदार्थांचा आस्वादसुद्धा घेता येईल. प्रवेश करतांनाच सगळ्यांना पाण्याची बॉटल सुद्धा देण्यात येईल.
कविसम्मेलन संस्मरणीय ठरावे याकरीता सर्व रोटरी सदस्य उत्कृष्ट नियोजनासह परीश्रम करीत आहेत. मनोरंजनासोबत वंचितांची समाजसेवा घडावी हा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा, असे आवाहन रोटरी क्लब अध्यक्ष सुरेश पारीक, सचिव आनंद शर्मा व प्रकल्पप्रमुख विजय मोदी यांनी केलेले आहे. अधिक माहिती आणि प्रवेशपत्रांसाठी विजय मोदी (मो नं ८८८८२०८०३०) किंवा आशिष पटेल (मो नं ९९२३२५२२२७) यांचेशी संपर्क साधता येईल.
Post a Comment