जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर च्या वर्ग दहावीच्या मुलांना निरोप
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :-जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर च्या वर्ग दहावीच्या मुलांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पडला वर्षभर केलेल्या मेहनतीचा परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर पेपरचे वेळेचे नियोजन तसेच कॉपीमुक्त आणि भयमुक्त परीक्षा सेंटरवर व्यवस्थित पेपर सोडून पुढील आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारे सायन्स किंवा पॉलिटेक्निक आपल्याला जो सब्जेक्ट आवडतो किंवा आपल्याला ज्यामध्ये करिअर करायचे तो विषय प्रवेश घेऊन उत्तुंग शिखर गाठावे असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामकृष्ण गुंजकर सर यांनी अध्यक्षीय भाषणातून केले
आयुष्यामध्ये पहिली ते सातवी ज्ञान मिळविण्याचा पहिला टप्पा त्यामध्ये आपण ज्ञान मिळवण्याचं प्रयत्न करत असतो आणि आठवी ते दहावी मध्ये विद्यार्थ्यांना आकलन मांडण्याची क्षमता बोर्डाच्या परीक्षेच्या माध्यमातून कळून येत असते त्यानंतर कॉलेजमध्ये त्या चे उपयोजन कसे करायचे आणि चौथा टप्पा ज्ञानार्जन म्हणजे मार्गदर्शन असे शैक्षणिक चार टप्पे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना प्राध्यापक गुंजकर सरांनी मांडले कार्यक्रमाला संस्थेच्या सचिवा गुंजकर मॅडम तसेच शाळेचे मुख्याध्यापक डी एस जाधव सर उपमुख्याध्यापक संतोष आल्हाट सर आणि जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर चे टीचिंग आणि नॉन टीचिंग सर्व कर्मचारी उपस्थित होतेAdvt.
Post a Comment