सिध्दीविनायक टेक्नीकल कॅम्पस मध्ये चैतन्य- २०२४ 

 खामगाव:-(पियूष मानकर) स्थानिक वसुंधरा बहुउद्देशिय सामाजिक संस्था, खामगांव व्दारा संचालीत सिध्दीविनायक टेक्नीकल कॅम्पस, शेगांव मध्ये दि. ०६ फेब्रुवारी २०२४ ते दि. १० फेब्रुवारी २०२४ दरम्यान "चैतन्य- २०२४" चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमांच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष मा. सागर फुंडकर, संस्थेचे उपाध्यक्ष तथा आमदार आकाशदादा फुंडकर, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंत जी. कुळकर्णी, तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रिती अ. चोपडे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आले.

महाविद्यालयातील पदवी व्दितीय वर्षातील इलेक्ट्रॉनिक्स शाखेतील विद्यार्थीनी कु. वैष्ण्वी राऊत या विद्यार्थीनीला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे झालेल्या "अविष्कार-२०२३" या कार्यक्रमामध्ये तृतीय बक्षिस देवुन संबोधण्यात आले. तसेच विद्यापीठस्तरीय झालेल्या अविष्कार या कार्यक्रमांमध्ये निवड झाल्यानंतर तिची राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. सागर फुंडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पदविका व्दितीय वर्षातील संगणक शाखेतील विद्यार्थी कल्पेश विजय अंबुस्कर या विद्यार्थ्यांला दहाव्या राष्ट्रीय तेंग सु डो "चॅम्पियनशिप- २०२३" (कराटे) मध्ये व्दितीय स्थान मिळाल्याबद्दल त्याचा महाविद्यालयाचे उपाध्यक्ष मा. आमदार आकाशदादा फुंडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

चैतन्य- २०२४ मध्ये विविध सांस्कृतिक व क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये हॉरर डे, मिस-मंच डे, बॉलीवूड डे, डान्स, ड्रामा, आणि सिंगिग या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेवून उत्कृष्ठ प्रकारे कला व नृत्य सादर केले. या पार पडलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभाग नोंदवीला. या चैतन्य- २०२४ कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. सागर फुंडकर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्याकडे लक्ष्य केंद्रीत करुन अभ्यासावर लक्ष द्यावे व येणाऱ्या २८ फेब्रुवारी च्या टेक फेस्ट मध्ये पण उत्कृष्ट सहभाग नोंदवावा याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंत जी. कुळकर्णी, तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रिती अ. चोपडे यांनी सुध्दा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

"चैतन्य- २०२४" कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता महाविद्यालयाचे प्रा. अनंता महाले व प्रा. श्रीकृष्ण ढोले तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमांचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अनंत जी. कुळकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. श्रीकृष्ण ढोले यांनी केले. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेवून कार्यक्रमांची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सागर फुंडकर तथा उपाध्यक्ष तसेच खामगांव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार  आकाशदादा फुंडकर यांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post