पत्रकार दिनानिमित्त हिंदी मराठी पत्रकार संघातर्फे राज्यस्तरीय पत्रकार सन्मान सोहळा थाटात संपन्न
मलकापूर (जनोपचार न्यूज नेटवर्क)आंतरराष्ट्रीय मानांकन 9001-2015 प्राप्त हिंदी मराठी पत्रकार संघातर्फे आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्य साजरा केला जाणारा ६ जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन मलकापूर जिल्हा बुलढाणा येथील जुने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात शुक्रवार, ६ जानेवारी रोजी या पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
समाजातील सत्य शोधून निष्पक्ष, निर्भिड व सजगपणे जनतेसमोर मांडण्याचा वसा घेऊन पत्रकारीतेच्या माध्यमातून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविणाऱ्या वृत्तपत्र संपादकांना व पत्रकारांना आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मदिनी राज्यस्तरीय पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या सोहळयाला प्रमुख अतिथी म्हणून मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवचंद्र तायडे, श्रीकृष्ण उगले साहेब ना.तहसीलदार, निलेश तायडे सहा. माहिती मंत्रालय मुंबई , बाळासाहेब जगताप ज्येष्ठ पत्रकार, धनश्रीताई काटीकर पाटील महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघ हे होते.
शिवचंद्र तायडे, यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आद्य पत्रकार व मराठी पत्रकार सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात पत्रकारीतेच्या माध्यमातून कठीण परिस्थितीतही जनप्रभोधन करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोलाचे योगदान दिले याबद्दल उपस्थित पत्रकार बांधवांना माहिती दिली तसेच प्रमुख पाहुणे मा. सहा माहिती आयुक्त निलेश तायडे यांनी आपल्या भाषणात उपस्थित पत्रकार बांधवांना विविध योजनांची माहिती दिली
सदर कार्यक्रमात राज्यस्तरीय पत्रकार रत्न पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अशोक जैस्वानी खामगाव, ज्येष्ठ पत्रकार हनुमान जगताप, ज्येष्ठ पत्रकार वीरसिंग दादा राजपूत यांना प्रदान करण्यात आला. तर राज्यस्तरीय आदर्श संपादक पुरस्कार नितेश मानकर संपादक जनोपचार ,राजेश इंगळे संपादक मलकापूर माझा, दैनिक मराठा दर्शन चे संपादक नारायण पानसरे, दैनिक बुलढाणा गर्जना चे संपादक गौरव खरे,दैनिक सत्य मंथन चे संपादक स्वप्निल आकोटकर, साप्ताहिक मलकापूर अबतक चे संपादक सय्यद ताहेरभाई,एकच घाव चे संपादक सय्यद अकबर,साप्ताहिक शब्द की गुंज चे संपादक शेख जमील भाई, दैनिक सरळ प्रश्नाचे संपादक अबू बागवान, प्रकाश थाटे संपादक भीम गर्जना लाईव्ह, निलेश चोपडे संपादक आपला मलकापूर, विकास वाघोदे संपादक मूकनायक यांना प्रदान करण्यात आला.
राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार श्रीकृष्ण तायडे, सतीश दांडगे, अजय टप, विनायक तळेकर, गजानन ठोसर,धीरज वैष्णव, अशोक रावणकार प्रवीण राजपूत, विनोद व्यवहारे, कैलास काळे नितीन भुजबळ, समाधान सुरवाडे, संदीप सावजी, डॉ. विजय भगत, देवेंद्र जैस्वाल, दीपक इटणारे, शेख निसार, उल्हास शेगोकार, सुधाकर तायडे, श्रीकांत हिवाळे ,गणेश तायडे, सर्वर पत्रकार, बिस्मिल्ला खान, सुनील देशमुख, भाऊराव व्यवहारे, विशंभर पुरकर , ,धर्मेश राजपूत, प्रदीप इंगळे, मयूर लड्डा गोपाल पारधी, विजय सपकाळ यांचा सत्कार करण्यात आला.
पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा स्वागत सत्कार केला जातो परंतु पत्रकारांसाठी अहोरात्र झटणारे वृत्तपत्र विक्रेते यांचाही सिंहाचा वाटा असतो वृत्तपत्र विक्रेते व वितरक यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांना सन्मानचिन्ह देऊन यावेळी गौरवण्यात आले हे विशेष आकर्षण ठरले कार्यक्रमात वृत्तपत्र विक्रेते सन्मान पुरस्कार वासुदेव झोपे, मुकुंद पाटील, राजू पाटील, अनिल उदगे , केशव सुपे, जगदीश तांबट, अरविंद पाटील, विलास पिंपळकर , रामेश्वर गोरले, गजानन वानरे राजेश सपकाळ यांना देण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष बागडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन हिंदी मराठी पत्रकार संघाचे नथुजी हिवराळे यांनी केले. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी अल्पपोहाराचा आस्वाद घेत कार्यक्रम उत्साहात संपन्न करण्यात आला.संपादक, पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते बांधवांचा यावेळी सन्मान पत्र व स्मृती चिन्ह देत गौरव करण्यात आला.
Post a Comment