जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स अँड गुंजकर ज्युनिअर अँड सिनिअर कॉलेज आवार येथे वार्षिक क्रिडा स्पर्धेचे आयोजन


आज दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स अँड गुंजकर ज्युनिअर अँड सिनिअर कॉलेज आवार येथे वार्षिक क्रिडा स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा श्री रामकृष्ण गुंजकर सर व संस्थेच्या सचिवा प्रा सौ सुरेखाताई गुंजकर तसेच शाळेचे मुख्याध्यापक प्रा श्री डी एस जाधव सर यांच्या हस्ते संत गजानन महाराज प्रतिमेचे पूजन व नारळ फोडून फोडून स्पर्धेचा श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी प्रा गुंजकर सर यांच्या  हस्ते क्रिकेट या खेळाचा टॉस करून प्रथम फलंदाजी संघ घोषित केला

जाहिरात फक्त शंभर रुपये 8208819438

.त्यानंतर उपस्थि 

त मान्यवरांनी खेळाडू संघांचा परिचय करून घेतला व त्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी हा शिक्षणात च पुढे न राहता उत्कृष्ठ खेळाडू सुद्धा व्हावा हा या मागचा हेतू प्रा श्री गुंजकर सर यांनी स्पष्ट केला. या क्रिडा स्पर्धेचे आयोजन वार्षिक स्नेह संमेलन आविष्कार च्या माध्यमातून करण्यात आले आहे.या संमेलना अंतर्गत येणाऱ्या १२ जानेवारी पर्यंत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी याचा आनंद घेऊन उत्स्पूर्त सहभाग घ्यावा .असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक प्रा श्री जाधव सर यांनी केले.या वेळी प्रा गुंजकर सर यांनी प्रथम फलंदाजी करून उपस्थित खेळाडूंचा उत्साह वाढवला. यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक श्री संतोष अल्ल्हाट सर , पर्यवेक्षक श्री  ब्राम्हणे  सर , श्री घोडके सर,श्री जाट सर,  श्री बंड सर ,श्री मोरे सर, श्री अविनाश ठाकरे सर , श्री फुंडकर सर ,ठाकरे मॅडम, डाबरे मॅडम  , देवचे मॅडम , अवथळे मॅडम, जामोदे मॅडम , मोरे मॅडम, सांजोरे मॅडम  भोपळे मॅडम ,वाघमारे मॅडम,देशमुख मॅडम, शेलकर मॅडम ,श्री तायडे भाऊ, इंगळे भाऊ, आदी शिक्षक व शिक्षकेत्तर सहकारी यांच्या समवेत विद्यार्थी उपस्थित होते.





Post a Comment

Previous Post Next Post