फेमस कवी पुरस्काराने  डॉ. उपर्वट सन्मानित

खामगांव दि.
    बुलडाणा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक, समाज प्रबोधनकार, पालि भाषेचे अभ्यासक, योगाचार्य डॉ. पी. आर. उपर्वट यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच,रत्नागिरी जिल्हा शाखा पुणे या समुहाद्वारे २०२३ चा फेमस कवी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

       डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच, पुणे यांचे वतीने महाराष्ट्रातील नामवंत कवीसाठी दि. १८ ते ३० डिसेंबर २०२३ या कालावधीत फेमस कवी पुरस्कार २०२३ साठी काव्यलेखन स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये ' मन ' या विषयावर दोनाक्षरी, चाराक्षरी, षडाक्षरी, अष्टाक्षरी, दशाक्षरी, शंकरपाळी, मुक्तछंद अशा दहा प्रकारामध्ये काव्यलेखन स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये खामगांव येथील सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. पी.आर. उपर्वट यांनी सर्व स्पर्धात सहभाग घेऊन उत्कृष्ट काव्यरचना सादर केल्यात. त्यांचे आयोजक मंडळाने परीक्षण करून  ' फेमस कवी पुरस्कार - २०२३'  डॉ. उपर्वट यांना देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी एरो होम्स सोसायटी, पुणे येथे आयोजित एका कार्यक्रमात वसंत चोबे यांचे हस्ते डॉ उपर्वट यांना प्रमाणपत्र व बुक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी  तुकाराम दौड गुरुजी,  अशोक माने ई.मान्यवर उपस्थित होते. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंचचे संस्थापक अध्यक्ष मनोज जाधव, संपादिका भावना खोब्रागडे,  पुणे जिल्हाध्यक्षा वैशाली लांडगे, कार्याध्यक्ष जयद्रथ आखाडे यांना दिले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post