जयहिंद लोकचळवळ आणि श्री छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने 

शेतकऱ्यांना मोफत पीक विमा काढून मिळणार !


खामगाव : जयहिंद लोकचळवळ आणि श्री छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने शेतकऱ्यांना मोफत पीक विमा काढून मिळणार आहे. त्यासाठी खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी संघटनेच्या एकता कॉप्म्प्लेक्स जलंब नाका नांदुरा रोड खामगाव येथील कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 ते रब्बी 2025-26 हंगामासाठी 3 वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यात शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जयहिंद लोकचळवळ आणि श्री छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले  आहे.

रब्बी हंगाम 2023-24 मध्ये  गहू (बागायत), हरभरा, रब्बी कांदा करिता 15 डिसेंबर, 2023 व उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग पिकाकरिता 31 मार्च, 2024 अशी आहे. त्यासाठी पीएमएफबीवाय (PMFBY) ऑनलाईन  पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे .

रब्बी हंगामामध्ये गहू (बागायत), रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग व रब्बी कांदा ( 6 पिके ) या अधिसूचित पिकांसाठी, अधिसूचित महसूल मंडळ/ क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल.

सन 2023-24 पासून “सर्वसमावेशक  पीक विमा योजना” राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने शेतकरी हिश्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार  आहे. पीक विमा भरण्याची मुदत १५ डिसेंबर २०२३ आहे.  पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा उतारा,  या कागदपत्रासह जयहिंद लोकचळवळ आणि श्री छत्रपती प्रतिष्ठानच्या एकता कॉप्म्प्लेक्स जलंब नाका नांदुरा रोड खामगाव येथील कार्यालयात दुपारी १२ ते ३ यावेळेत उपस्थित रहावे तसेच अधिक माहितीसाठी  9226119476 मोबाईल क्रमांकावर, संपर्क करावा असे आवाहन स्वप्नील ठाकरे पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post