सिध्दीविनायक टेक्नीकल कॅम्पस, शेगांव मध्ये पूल कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह ला भव्य प्रतिसाद
खामगाव:- वसुंधरा बहुउद्देशिय सामाजिक संस्था, खामगांव व्दारा संचालीत सिध्दीविनायक टेक्नीकल कॅम्पस, शेगांव मध्ये दि. 29, 30 डिसेंबर 2023 रोजी दोन दिवसीय विद्यार्थ्यां करीता पूल कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये 12 वी, आयटीआय (इलेक्ट्रीकल, फिटर) पदविका आणि पदवी (विद्युत आणि यंत्र अभियांत्रिकी) तसेच विविध पदवी प्राप्त विद्याथ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता.
या मध्ये बेन्टल अॅटोमोटीव्ह प्रा. लि., प्रेटल अॅटोमोटीव्ह इंडिया प्रा. लि., व्हिसकॉन रबर प्रा. लि., रविराज हायटेक प्रा. लि., एक्सुबरन्ट सिस्टीम प्रा. लि., नामांकित कंपनीच्या व्यवस्थापनाने या महा विद्यालयामार्फत विद्यार्थ्यांना ही संधी प्राप्त करुन दिली होती. या प्लेसमेंट ड्राईव्हकरीता दि. 29.12.2023 रोजी बी.ई. करीता 86, विविध पदवी करीता -33 डिप्लोमा करीता-26 आयटीआय करीता-06, एकुण 151 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात येऊन आपल्या नावाची नोंदणी केली तर ऑन लाईन गुगल लिंग वर 237 विद्यार्थ्यांनी आपल्या नावाची नोंद नोंदविली. तसेच दुसऱ्या दिवशी दि. 30.12.2023 रोजी बारावी सायन्स, कॉमर्स आणि आर्ट करीता 48 विविध पदवी करीता 11, आयटीआय, करीता 03, तर ऑन लाईन गुगल लिंग वर 296 विद्यार्थ्यांनी आपल्या नावाची नोंदणी केली.
या प्लेसमेंट ड्राईव्हसाठी कंपनीचे मानव संसाधन अधिकारी (एचआर) श्री. देविदास परदेशी, श्री. ललित चौधरी, श्री. कल्पेश पाटील, व्यवस्थापक श्री. रोहीत बडगुजर, निवड अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. या कंपनीचे उपस्थित प्रतिनिधीचे स्वागत अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंत जी. कुळकर्णी व तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. प्रिती अ. चोपडे महाविद्यालयाचे पदवी विभागाचे प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी प्रा. प्रतिक देशमुख तसेच पदविका विभागाचे प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी प्रा. सागर पानगोळे यांच्या हस्ते करण्यात आले. कंपनीचे निवड अधिकारी श्री. रोहीत बडगुजर यांनी कंपनीच्या प्लेसमेंट ड्राईव्ह बाबतची थोडक्यात माहिती करुन दिली. यानंतर विविध महाविद्यालयामधुन आलेल्या विद्यार्थ्यांनी या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये आपला सहभाग नोंदविला. यावेळी विद्यार्थ्यांना उद्बोधन करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंत जी. कुळकर्णी यांनी उमेदवाराना नोकरी करतांना कोणत्या बाबीवर लक्ष केंद्रीत करावे आणि आपल्या भविष्यामध्ये उज्वल करीअर कसे घडवता येईल याबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यंत्र अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. बबलु झा यांनी भविष्यामध्ये कशा प्रकारे यशस्वी होता येईल या बद्दल उपस्थिती विद्यार्थ्यांना संबोधन केले. कंपनीचे व्यवस्थापक श्री. कल्पेश पाटील यांनी कंपनी बाबत सविस्तर माहिती आणि कंपनी व्दारा देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा बाबत माहिती दिली, त्यानंतर कंपनीचे निवड व्यवस्थापक अधिकारी श्री.
रोहीत बडगुजर यांनी कंपनी व्यवस्थापन आणि भविष्यातील संधी यावर प्रकाश टाकला.
सिध्दीविनायक टेक्नीकल कॅम्पस मध्ये या अगोदरही नामांकित उद्योग समुहासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते व महाविद्यालयातील निवडक विद्यार्थ्यांची जीकेएन ऐरोस्पेस, पुणे, बजाज अॅटो लि. संभाजी नगर/ पुणे ई. जी. कांतावाला पुणे, फॅल्श इलेक्ट्रॉनिक्स पुणे, संदेन विकास प्रा. लि., पुणे, धुत ट्रॉन्समिशन संभाजी नगर, लिअर कापर्पोरेशन पुणे, पीयागो प्रा. लि., व्हिडीओ कॉन प्रा. लि., मोबाईल कॉम प्रा. लि., ब्ल्यु समायर, न्यू दिल्ली, अॅडव्हांस इमरर्जन्सी लि. मुंबई व हिदुस्थान कॉम्पयुटर लि. (एचसीएल) अशा नामांकित उद्योग समुहात मोठ्या प्रमाणात निवड झाली आहे. ही बाब उल्लेखनिय आहे. सदर पुल कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वतीतेकरीता अथक परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष मा. सागर फुंडकर व उपाध्यक्ष अॅड. मा. आमदार आकाशदादा फुंडकर यांनी महाविद्यालयातर्फे मुलाखती झालेल्या व पुढील नियुक्तीसाठी पात्र ठरलेल्या सर्व विद्याथ्यांचे अभिनंदन करुन उज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
Post a Comment