राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पत्रकारिता समाजसेवा पुरस्कार नंदु कुलकर्णी यांना जाहीर
शेगाव :- राष्ट्रसंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पत्रकारिता क्षेत्रातील समाजसेवा पुरस्कार शेगावातील दैनिक तरुण भारत चे ज्येष्ठ पत्रकार नंदु कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थापित अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी जिल्हा अमरावती सहलग्नित असलेली शेगाव शहर व तालुक्यातील शाखा च्या वतीने वंदनीय राष्ट्रीय तुकडोजी महाराज यांच्या 55 व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजीत भव्य जाहिर कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाजसेवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे यामध्ये नंदु कुलकर्णी दैनिक तरुण भारतचे पत्रकार यांना पत्रकार क्षेत्रातून हा पुरस्कार घोषित झाला आहे
तसेच गुलाबराव महाले यांना यशस्वी शेतकरी पुरस्कार घोषित झाला आहे वसुदेवराव अधिकार गुरुजी संगीत क्षेत्रात पुरस्कार जाहीर झाला आहे श्री घनश्याम मुंदडा सर आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित करण्यात आला आहे डॉक्टर अभयजी गोयंका यांना वैद्यकीय क्षेत्रात हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे तसेच श्री विजयकुमार यादव यशस्वी उद्योजक पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे श्री गोविंदराव गणगणे उदयोजकपुरस्कार जाहीर करण्यात आला आहे तसेच वैद्यकीय क्षेत्रातील पुरस्कार डॉक्टर ज्ञानेश्वर जी तायडे तसेच गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक पुरस्कार रामदासजी वनवे तसेच जेष्ठ प्रचार पुरस्कार किसनराव वाकोडे गुरुजी यांना पुरस्कार घोषित करण्यात आलेले आहे
या कार्यक्रमाचे अध्यक्ष ह भ प दामोदर जी पाटील गुरुजी सर्वाधिकारी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम तसेच उद्घाटक ह भ प गुलाबराव खोसे महाराज अध्यक्ष ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभाग तसेच विशेष उपस्थित डॉक्टर ताराचंदजी कंठाळे उपाध्यक्ष ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभाग आचार्य ह भ प वेरुळकर गुरुजी आजीवन प्रचारक श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे तसेच
यावेळेस शालेय सामूहिक देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा घेण्यात येणार आहे
तसेच निमंत्रित भजन मंडळ स्पर्धा यावेळेस घेण्यात येणार आहे
तसेच सायंकाळी सात वाजता देशभक्तीपर गीत स्पर्धा करा ओके संमेलन घेण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त संख्येने रविवार दिनांक 31 डिसेंबर 2023 सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंतच्या या कार्यक्रमाला स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ शाळा क्रमांक पाच श्रीराम नगर शेगाव जिल्हा बुलढाणा येथे मोठ्या संख्येने हजर राहावे उपस्थित रहावे अशी विनंती आयोजक ह भ प सुशील महाराज वनवे जिल्हा मार्गदर्शक, अनिलजी उंबरकर जिल्हा सचिव , डॉ हरीदासजी आखरे तालुका मार्गदर्शक, रामदासजी महल्ले जिल्हा संघटक अतुलजी उमक जिल्हा सदस्य, ज्ञानेश्वर कुकडे ,महेंद्रजी तालुका सेवाधिकारी यांनी केलेली आहे यांना
Post a Comment