जनसेवक प्रविण कदम प्राउड ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानीत
शनिवार दि 16/12/23 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन पुणे येथे. महाराष्ट्र बुक ऑफ रेकाॅडॅस टाईम्स ऑफ पुणे यांच्या वतीने 2023 या वर्षीचा महाराष्ट्रातील सामाजिक. राजकीय. शैक्षणिक. औद्योगिक. कला व क्रिडा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना. प्राईड ऑफ महाराष्ट्र " या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सामाजिक क्षेत्रातुन पुरस्कारा साठी खामगांव शहरातील जनसेवक तथा माजी नगरसेवक प्रविण कदम यांची निवड करून त्यांना कार्यशील समाजसेवक प्राईड ऑफ महाराष्ट्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सलग 25 वर्षापासून अविरत सुरू असलेली रूग्णसेवा. गरजु विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व मदत. गरीब गरजु वयोवृद्धां करिता श्रावणबाळ व विधवा निराधार महीलांना शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी कार्य. जातीय सलोखा टिकून रहावा या करिता विविध सामाजिक उपक्रमाव्दारे प्रयत्न.
चिकन गुणिया ते कोवीड या महामारीच्या काळात केलेले उल्लेखनीय कार्य.
वृक्षारोपण व संवर्धनासाठी केलेले प्रशंसनिय कार्य. मागील 15 वर्षापासून नगरसेवक या पदावर कार्यरत राहून शासनाच्या घरकुल योजनेच्या माध्यमातून गरीब व गरजू लाभाथ्यॅना लाभ मिळवुन देण्याचे यशस्वी कार्य. इतर विकासात्मक कामे करून कार्य. रक्तदानाचे महत्व पटवून देत अनेक रक्तदान शिबिरांचे व आरोग्य शिबिरांचे आयोजना बद्दल सर्वच क्षेत्रातुन लोकहिताचे कार्य करीत असल्याबद्दल जनसेवक प्रविण कदम यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराच्या माध्यमातून खामगांवच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवल्या गेला आहे.
Post a Comment