जमात ए इस्लामी हिंदी खामगाव शाखा च्या महिला विभागा तर्फे महिला पोलिसांचा सत्कार
खामगाव :- जमात-ए-इस्लामी हिंद शाखा खामगावच्या महिला विभागातर्फे विविध पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्थानिक डीवायएसपी कार्यालयात 14 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता स्थानिक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात सत्कार करण्यात आला. या छोटे खानी सत्कार कार्यक्रमामधे उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे यांची प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
जमात-ए-इस्लामी हिंद खामगाव शाखेच्या महिला विभागातर्फे महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुष बुके व भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला . विविध पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये .राची पुसाम, सीमा खिल्लारे, प्रतीक्षा जाधव, संध्या ताठरकर, दिव्या काळे, रंजना काळे, मनाली कुलकर्णी, चारुशीला गवई, वंदना वारे, नीता खुरपडे, छाया गवई, चंद्रलेखा शिंदे, रेखा सरोदे, रुपाली थोरात यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी डीवायएसपी विनोद ठाकरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या युगात स्त्री-पुरुष असा भेद करु नये प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला उत्कृष्ट कार्य करत आहेत .मुलगा आणि मुलगी यांच्यात मतभेद नसावेत, दोघांना समान वागावे.जेव्हा स्त्री-पुरुष वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात तेव्हा देशाची प्रगती होते आणि आर्थिकदृष्ट्याही देश मजबूत होतो, या मुळेच आपल्या देशाचे नाव उज्ज्वल होते.या कार्यक्रमात पोलीस विभागा तर्फे सुद्धा जमात-ए-इस्लामी हिंद खामगाव शाखेच्या महिला विभागाच्या महिलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.वरिष्ठ श्रेणी पोलीस कर्मचारी आशा लहासे यानी कार्यक्रमाचे संचालन करताना हा सत्कार प्रेरणादायी असल्याचे सांगून महिलांमध्ये संयम (पेशन्स) हा विशेष गुण निसर्गाने दिला आहे, त्यामुळेच महिला आपले काम उत्कृष्टपणे करत आहेत
Post a Comment