सायबर सुरक्षा काळाची गरज या विषयावर अकोल्यात कार्यशाळा
अकोला जनोपचार :-स्मार्टफोन हीआजच्या काळाची मूलभूत गरज झालेली असून, याचा उपयोग प्रत्येक व्यक्ती हा करतच आहे. परंतु, या तंत्रविज्ञानाच्या युगात इंटरनेटच्या चुकीच्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये खूप वाढ झालेली दिसून येते. विद्यार्थ्यांमध्ये, सायबर गुन्हे आणि त्याबाबतची सुरक्षा याविषयी जागृती करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सायबर आणि क्विक हिल फाउंडेशन, पुणे यांच्या सहयोगाने, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाचे प्राचार्य विभागाचे डॉ. हरिदास खरात यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील विद्यार्थिनी शितल फंदट आणि वैभवी गंगावते यान्नी स्थानिक भिरड वाडी , अकोला येथील संताजी इंग्रजी प्राथमिक शाळा येथे सायबर सुरक्षा विषयावर विद्यार्थ्यासाठी कार्यशाळा घेतली
विद्यालयाचे मुख्याध्यापक मंगेश वानखडे यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा हा विषय अति महत्त्वाचा असून, प्रत्येकाने मोबाइलचा वापर कमीत कमी आणि अति करावा, आवश्यकता असल्यासच असे आवाहन करून मार्गदर्शन केले . मोबाइलमध्ये २ स्टेप व्हेरिफिकेशन कसे करावे, करावे, अँटिव्हायरस सॉफ्टवेअर सांगितली. यावेळी सायबरसुरक्षा विषयावर विद्यार्थ्यांसाठीकोणकोणत्या प्रकारे घडतात, वाढत्या सोशल मीडियाच्या वापरातून अॅप्सद्वारे डेटा कशाप्रकारे चोरी होतो याबाबत सविस्तर माहिती सांगितली.
Post a Comment