मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा द्वारा
समाजसेवी रवि जोशी यांचा सन्मान।
खामगाव जनोपचार :- दि.९ ऑकटोंबर रोजी स्था.नांदूरा रोड वरील तुलसी अपार्टमेंट येथे तिरुपती बालाजी संस्थान नांदुरा द्वारा संचालित मोहनराव नारायणा नेत्रालय,नांदुरा च्या व्हिजन सेंटर खामगाव शाखेचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला।यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचे स्वागत करण्यात आले। या प्रसंगी सतत मागील अनेक वर्षापासून सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर व कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवी रवि जोशी यांचा मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा तर्फे डाॅ.अशोकजी बावस्कर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, दुपट्टा, व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। रवि जोशी यांनी मंचकावर उपस्थित पं.पू.शंकरजी महाराज व ह.भ.प.संजयजी महाराज पाचपोर यांचे आशीर्वाद घेतले।
![]() |
जाहिरात फक्त 99 रुपयात: संपर्क 8208819438 |
Post a Comment