लॉयन्स क्लब खामगाव, संस्कृती व्दारा आयोजित रंग दे तिरंगा कार्यक्रमामध्ये 

युगधर्म पब्लिक स्कूल ची सर्वोत्कृष्ट कामगिरी"


खामगाव :- दि. १२/०८/२०२३ रोजी लॉयन्स क्लब खामगाव, संस्कृती व्दारा आयोजित रंग दे तिरंगा कार्यक्रमामध्ये युगधर्म पब्लिक स्कूल ची गतवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा अ गट (केजी-१, २), ब गट (इयत्ता १-४) आणि क गट(इयत्ता ५-८) या तिन्ही गटामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी राहिली. या कार्यक्रमासाठी खामगाव येथील विविध शाळांनी सहभाग नोंदविला होता, यामधून युगधर्म पब्लिक स्कूल ने नेत्रदीपक कामगिरी केली.युगधर्म पब्लिक स्कूल ने या कार्यक्रमामध्ये 'गट अ' मध्ये तृतीय पारितोषिक, 'गट ब' मध्ये प्रथमपारितोषिक आणि 'गट क' मध्ये द्वितीय पारितोषिक मिळवले. तसेच वैयक्तिक पुरस्कारामध्ये सुध्दा उत्कृष्टनृत्य दिग्दर्शन, उत्कृष्ट गीत निवड, उत्कृष्ट नृत्य प्रदर्शन अशा विविध पुरस्कारांसह तिन्ही गटामध्ये 'सर्वोत्कृष्टकामगिरी' या विषेश पुरस्कार ची मानकरी सुध्दा ठरली आहे.या कार्यक्रमासाठी युगधर्म पब्लिक स्कूल चे अध्यक्ष श्री गोपालजी अग्रवाल, शाळेचे सचिव  मधुरअग्रवाल यांचे विशेष मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. सोबतच शाळेचे मुख्याध्यापक  संदीप सपकाळ यांच्याा र्गदर्शनाखाली जयप्रीतकौर मेहरा, सचिन राठोड, राम धोंडे, संगीता देशमुख तसेच सर्व शिक्षकवृंद आणिशिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच नृत्य दिग्दर्शक सोनू दाभाडे यांचे विशेष मार्गदर्शनविद्यार्थ्यांना लाभले.


Post a Comment

Previous Post Next Post