शिवसेनेचे पदाधिकारी यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश 

      अकोट(सय्यद शकील) शिवसेनेचे शहर संघटक वाहीदखान तसेच तफाझ्झूल हुसैन,आंसार खान,इल्यास खान, गफ्फार खान, वीस पंचवीस जणांनी  वंचित बहुजन आघाडी  मध्ये प्रवेश घेतला. राष्ट्रीय अध्यक्ष  बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश घेण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ देंडवे,  मिलिंद भाऊ इंगळे, यांच्या मार्गदर्शनामध्ये मुस्लिम बांधवांचा प्रवेश  करण्यात आला.

याप्रसंगी माजी ज़िल्हा उपाध्यक्ष दिपक भाऊ बोडखे, अकोट तालुका अध्यक्ष चरण इंगळे, शहर महासचिव जम्मू पटेल, विशाल आग्रे, दिनेश घोडेस्वार, इरफान अली मीर साहेब, शफीक अली मीर साहेब, इमरान खान, अक्षय तेलगोटे, यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रवेशा करिता जमू पटेल यांनी मुख्य भूमिका पार पडली.

Post a Comment

Previous Post Next Post