विद्यार्थ्यांचा ठिय्या अन... बस लागली धाऊ!
आ फुंडकरांच्या एका फोन आणि विद्यार्थ्यांनी मानले आभार!
खामगाव ::-* अनेक प्रवाशी असतांना वेळेवर सुटणारी गाडी तासभर आली नाही, त्रस्त विद्यार्थ्यांनि ठिय्या आंदोलन सुरू करताच हीच बस आ अँड फुंडकर यांच्या एका फोन ने केवळ 5 मिनिटात उपलब्ध झाली.
खामगाव शहापूर एस टी बस दररोज दुपारी 3.45 ला खामगाव बस स्थानाकरून सुटते. परंतु आज सायंकाळी 5 वाजले तरी बस आली नाही. यावेळी काही विद्यार्थ्यांनी बस स्थानक नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांनी गाडी उपलब्ध नसल्याचे सांगितले. यामुळे असंख्य विध्यार्थी , व नागरिक अडकून पडले. काही विद्यार्थी व विद्यार्थ्यांनिनी याबाबत आ अँड आकाश फुंडकर यांचेशी संवाद साधला. व बस स्थानकावरच ठिय्या आंदोलन सुरू केले, त्यानंतर आ अँड फुंडकर यांनी खामगाव आगार अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश दिल्यानंतर केवळ 5 मिनिटातच खामगाव बस स्थानकावर खामगाव शहापूर एस टी बस लागली. व एक दीड तासाने उशिरा विद्यार्थीसह सर्व प्रवाशी आपल्या गावी रवाना झाले. या सर्वांनी आ अँड फुंडकर यांचे आभार मानले.
Post a Comment