उकाडा त्यात लग्नसराई, पावसाळा पूर्वी दुरुस्तीच्या नावावर लोडशेडिंग थांबवा
खामगाव ::- प्रचंड उकाडा त्यात लग्नसराई, महावितरण ने दुरूस्ती चे नावाने सुरू केलेली कामे आठवडाभर थांबवा लोडशेडिंग करू नका असे निर्देश भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ अँड आकाश फुंडकर यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिले आहेत. पावसाळ्याच्या पूर्वी महावितरण कडून शहर व ग्रामीण भागात दुरुस्तीचे कामे केली जातात. तारेवर येणारी झाडे तोडणे , व इतर कामे पावसाळा पूर्वी केली जातात. परंतु सद्या उन्हाचा उकाडा 40 ते 45 अंश वर जात आहे. शहरासह प्रत्येक ग्रामिण गावात दररोज लग्न सोहळे पार पडत आहेत.अवकाळी पाऊस व प्रचंड उकाळा असल्याने या सर्व कार्यक्रमात सर्वाना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
त्यात आता पावसाळा पूर्वी महावितरण ने दुरुस्ती कामे शहर व तालुक्यात सुरू केलेली आहे. यामुळे ऐन दुपारी ,रात्री महावितरण कडून लाईन बंद केली जात आहे.त्यामूळे लग्न कार्यक्रम असणाऱ्या परिवारासह संपूर्ण नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. हीच बाब लक्षात आल्या यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ अँड आकाश फुंडकर यांनी खामगाव महावितरण अधीक्षक अभियंता यांना या समस्याबाबत चर्चा केली. पावसाळ्याला वेळ आहे , सद्या उन्हामुळे सर्व त्रस्त आहेत त्यामुळे एक आठवडा किंवा अधिक काही दिवस महावितरण दुरूस्तीचे काम थांबवावे असे निर्देश दिले. या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करावी असेही आ अँड फुंडकर यांनी केले. यानंतर अनेक गावातील वीज पुरवठा लगेच कार्यान्वित सुरू झाला. अनेक गावकऱ्यांनी , वर, वधू पित्यांनी व नागरिकांनी आ अँड फुंडकर यांचे आभार मानले. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली
Post a Comment