खामगांव एम. आय.एम.च्यावतीने जाहीर निषेध
नगरपरिषदेला शरम करो म्हणत लावली बेशरम ची झाडे
खामगांव :- दि.२२/०४/२०२३ येत्या काही दिवसांवर रमजान ईद येऊन ठेपली असून या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे व रस्ते ना दुरुस्त आहेत त्यामुळे नगरपरिषदेने तात्काळ रस्त्यावरील खड्डे बुजवावे यासाठी आज एम आय एमचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक मोहम्मद आरिफ पहलवान यांच्या नेतृत्वात बेशरम ची झाडे लावून आंदोलन करण्यात आले.
येणाऱ्या रमजान ईद निमित्त निळकंठ नगर मधून
ईदगाहकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोठ-मोठ खड्डे नाली बुजवण्यात यावे, मार्गावरील काटेरी
झाडे तोडण्यात यावे इ. मागण्याची पुर्तता करण्यात यावे म्हणून एम.आय.एम.
खामगांवच्यावतीने दि. ३१/०३/२०२३ रोजी स्थानिक नगर परिषदला निवेदन दिले होते.
यावर नगर परिषदने कोणतीच कामे केले नाही. निवेदनाला केराची टोपली दाखवली च्या
निषेधार्थ दि.१७/०४/२०२३ रोजी निळकंठ नगर मधून ईदगाहकडे जाण्याच्या रस्त्यावरील
खड्यामध्ये व नालीमध्ये तसेच राष्ट्रीय हायस्कूल, शौकत कॉलनी, डॉ.वराडे दवाखाना,
मस्तान चौक ई. परिसरात बेशरमची झाडे लाऊन निषेध व्यक्त केला आहे. यावेळी 'शरम
करो शरम करो नगर पालिका शरम करो', मुर्दाबाद मुर्दाबाद नगर परिषद मुर्दाबाद',
मुस्लीमांसोबत सावत्रपणाची वागणुक बंद करा अशा घोषणा देण्यात आल्या तसेच येणाऱ्या
दोन महिन्यानंतर बकरी ईद पर्यंत ही मागणी पुर्ण न झाल्यास पावसाळ्यात त्याच खड्यातील
नालीचे पाणी नगर परिषद मध्ये टाकुन मोठ्या प्रमाणपत्र आंदोलन करण्यात येईल असा
ईशारा देण्यात आला.
सदर आंदोलनात माजी नगर सेवक मोहम्मद आरीफ पहेलवान, सईद मिर्झा, यासीन
पठाण, मोहम्मद शाकु, रज्जाक कुरेशी, राजीक खान, मोहम्मद नवेद, मोहम्मद मुजम्मील
व एम.आय.एम.चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment