बुलढाणा अर्बन संस्थेला दिलेला चेक अनादरीत झाला
खामगांव- बुलढाणा अर्बन पत संस्था खामगांव शाखेतुन घेतलेल्या कर्जाच्या
परतफेडी करिता दिलेला चेक अनादरीत झाल्यामुळे आरोपीस वि. न्यायदंडाधिकारी
प्रथम वर्ग कोर्ट नं. २ खामगांवचे न्यायाधीश श्री साने साहेब यांनी आरोपीस शिक्षा
ठोठावली आहे.
बुलढाणा अर्बन पतसंस्था खामगांव शाखेतुन आरोपी अन्सार अहेमद
मोहम्मद इब्राहीम रा. जुनाफैल खामगांव याने अॅटो रिक्षा करिता कर्ज घेतले होते
सदर कर्ज थकीत झाल्यामुळे बुलढाणा अर्बन पतसंस्थे तर्फे आरोपीस क रकमेची
वारंवार मागणी केली असता आरोपी अन्सार अहेमद याने बुलढाणा अर्बन संस्थेस
कर्ज परतफेडीकरिता त्याचे खाते असलेल्या दि जनता कमर्शियल बॅक शाखा
खामगांवचा धनादेश रक्कम रुपये १,४०,००० /- चा दिला होता व सदर चेक
वटविण्यास टाकल्यास सदर चेकची रक्कम फिर्यादी संस्थेस हमखास मिळेल अशी
हमी सुध्दा फिर्यादी संस्थेस अन्सार अहेमद याने दिली होती. फिर्यादी संस्थेने
अन्सार अहेमदच्या आश्वासनानुसार सदर चेक वटविण्याकरिता टाकले असता
सदरचा चेक अनादरीत झाला होता. त्यामुळे फिर्यादी संस्थेने अन्सार अहेमद याला
अॅड. रमेश भट्टड यांचे मार्फत रितसर नोटीस पाठवुन चेकच्या रकमेची मागणी
केली होती. अन्सार अहेमद याने नोटीसीची पुर्तता न केल्यामुळे फिर्यादी बुलढाणा
अर्बन संस्थेने वि. न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग कोर्ट खामगांव येथे एन आय अॅक्टचे
कलम १३८ नुसार आरोपी विरूध्द फिर्याद दाखल केली होती. सदर प्रकरणा मध्ये फिर्यादी संस्थेने त्यांचे तर्फे संस्थेचे अधिकृत प्रतिनिधी मोहन राखोंडे व इतर दोन
साक्षीदारांची साक्ष नोंदविली आहे तसेच सदर प्रकरणा मध्ये आरोपीने वरील
साक्षीदारांची उलट तपासणी वकीलांमार्फत घेतली तसेच स्वतःचा पुरावा सुध्दा वि.
न्यायालयात दिलेला आहे. सदर प्रकरणा मध्ये दोन्ही पक्षांच्या वकीलांच्या
युक्तीवादानंतर वि. न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग कोर्ट नं. २ खामगांव श्री साने साहेब
यांनी आरोपी अन्सार अहमद मोहम्मद इब्राहीम यास सदर चेक अनादरीत
झाल्याबाबत दोन महिन्याची साधी कैद व रक्कम रुपये २,८०,०००/- एवढा दंड
ठोठाविला असुन, दंड न भरल्यास पुन्हा दोन महिनयाची साधी कैदीची शिक्षा दि.
१५.४.२०२३ रोजी ठोठावली आहे. सदर प्रकरणा मध्ये बुलढाणा अर्बन पतसंस्थे
तर्फे अधिवक्ता अॅड. रमेश (बाबु) भट्टड व अॅड. अंकीत अग्रवाल यांनी कामकाज पाहिले.
![]() |
Adv.Ramesh bhattad |
Post a Comment