शासकीय तंत्रनिकेतन खामगांवच्या विद्यार्थ्यांनी पुण्यात प्रोजेक्ट स्पर्धेत जिंकले दुसरे बक्षीस
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण परीक्षा मंडळ मुंबई आणि श्री अनंतराव पवार अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ११ व १२ एप्रिल २०२३ रोजी पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आलेल्या टेक्नोथॉन-२०२३ स्पर्धेत गट-५ मधील यंत्र अभियांत्रिकी शाखेकरिता असलेले रोख १५०००/- व प्रमाणपत्र असे मानाचे दुसरे बक्षीस शासकीय तंत्रनिकेतन खामगांवच्या यंत्र अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी जिंकलेले आहे.
आदित्य मोरे, सागर पांडे, अविनाश होनाळे, हरीश सोनोने, अभिषेक इंगळे, अमेय देशमुख व कु योगिता मामटकार या विद्यार्थ्यांनी प्रा राजेश मंत्री यांच्या मार्गदर्शनात कृषी क्षेत्रात क्रांती घडविणारा आणि रिमोट कंट्रोलद्वारे चालविला जाणारा रोबोट बनविला जो शेतात वॉटर स्प्रेयिंग आणि बी-बीजवाई पेरण्याचे कार्य करतो. अगदी कमीत कमी खर्चात म्हणजे अवघ्या दहा हजार रुपयात त्यांनी हा वर्किंग प्रोजेक्ट बनविलेला आहे. या रोबोटला कॅमेरा बसविला तर हा रिमोटद्वारे आगीत जाऊन कोणी तिथे अडकलेला असल्यास त्याची माहितीसुद्धा देऊ शकतो. पुणे येथील प्रदर्शनाला अनेक विद्यार्थी, शिक्षणतज्ञ, निमंत्रितगण व उद्योजक भेट देतात, त्यापैकी अनेक उद्योजकांनी या विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्टमध्ये रस दाखविला आणि त्यांना यात काही सुधारणादेखील सुचविल्या. या प्रोजेक्टचे व्यावसायिक मॉडेल बनविण्यात अनेकांना उत्सुकता दिसली.
![]() |
जाहिरात |
दुस-या क्रमांकाचे पुरस्कार आणि ते ही पुण्यात मिळाल्यामुळे संस्थेतील सर्व अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे. हे विद्यार्थी त्यांच्या यशाचे श्रेय महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालय मुंबईचे संचालक डॉ विनोद मोहितकर, अमरावती विभागीय सहसंचालक डॉ विजय मानकर, प्राचार्य डॉ समीर प्रभुणे, विभागप्रमुख प्रा डॉ अनंत ढोले, मार्गदर्शक प्रा राजेश मंत्री, संस्थेचे अधिकारी, कर्मचारी व सहकारी यांचेसोबत आपापल्या पालकांना देतात आणि भविष्यात याहूनही अधिक चांगला प्रोजेक्ट बनवून दाखवू जो आमच्या कृषी क्षेत्रातील बळीराजाच्या कष्टाचे निवारण करू शकेल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे.
Post a Comment