खामगावत उद्या जम्बो विकास कामाचे भूमिपूजन

 आ फुंडकरांच्या शुभहस्ते उद्या शहरात 11 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन        

    खामगाव : जनोपचार न्यूज नेटवर्क:- भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ अँड आकाश फुंडकर यांच्या शुभहस्ते उद्या शनिवार 25 फेब्रुवारी रोजी शहरातील विविध प्रभागात 11 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भमीपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आहे आहे.  शजरातील प्रभाग क्र 1, 2, 3 , 5, 8, 11, 13, 14 व 15 येथील रस्ता, नाली, पाण्याची टाकी, ध्यानगृह, बगीचा , यासह कामसह  हरित पट्टा विकसित करणे अश्या 11 कोटी रुपये खर्चाच्या 34 कामांचे भूमिपूजन आ अँड आकाश फुंडकर यांचे शुभहस्ते व भाजप सोशल मीडिया प्रदेश संयोजक सागरदादा फुंडकर यांचे विशेष उपस्थितीत पार पडणार आहे. 


या कार्यक्रमाला भाजप शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, जिल्हा सचिव संजय शिनगारे, माजी नगराध्यक्षा सौ अनिता डवरे, उपाध्यक्ष मुन्ना पुरवार, भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड, शहराध्यक्ष शुभम देशमुख, महिला आघाडी शहाराध्यक्षा सौ रेखा जाधव यांचेसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दुपारी 12 वाजेपासून सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी न प सदस्य विलास काळे, सौ भाग्यश्री मानकर, शहाबानो जहिरउल्ला शाह, सौ अर्चना टाले, श्रीमती शोभा रोहनकार,सौ शिवानी कुलकर्णी, सतीशअप्पा दुडे, सौ संतोष पुरोहित, राजेंद्र धनोकार, सौ रत्नमाला पिंपळे,ओमप्रकाश शर्मा, सौ सरला कावणे, राकेश राणा, सौ सीमा वानखडे, जकीयाबानो शेख अनिस, प्रवीण कदम, सौ लता गरड, सौ दुर्गा हत्तेल, गणेश सोनोने व हिरालाल बोर्डे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post