शासनमान्य पत्रकार संरक्षण समितीची जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी


बुलढाणा जनोपचार न्यूज नेटवर्क
पिंपळगाव राजा पोलिस स्टेशन हद्दीत क्रिकेट सामान्य दरम्यान दोन गटात झालेल्या हानामारिचे शुटिंग का केले याचा जाब विचारत
पत्रकार महम्मद तौसिफ मो. शफीक रा पिंपळगावराजा यांना बेदम मारहाण करणाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शासनमान्य पत्रकार संरक्षण समिती बुलढाणा च्या वतीने जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम बोर्डे व जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. महम्मद तौसिफ मो. शफीक हे पिपळगाव राजा येथील रहिवाशी असून साप्ताहीक शब्द की गुंज या वृत्तपत्राचे उपसंपादक असून १७ फेब्रुवारी२०२३ रोजी ते सायंकाळी ५ वाजता क्रिकेट सामन्याचे वृत्तांकन करण्यासाठी गेले असता, तेथे व्हीडीओ शुटींग व बातमी संकलन करीत असतांना आरोपी मुजफ्फर इनामदार, अजगर इनामदार, शेख जिशान, जुबेर इनामदार, माजिद  इनामदार, रजा उल्लाखान, शमीउल्लाखान, शेख उमर सै. शाहीद, इरफान इनामदार यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी पत्रकार महम्मद तौसिफ मो. शफीक यांना प्रचंड मारहान करुन गंभीर दुखापत केली आहे. त्यामध्ये त्यांचा एक दात खुडला असून गुप्त मार मोठया प्रमाणात आहे. असे असतांना सुध्दा सदर घटनेची तक्रार पिंपळगावराजा पो.स्टे. येथे दिली असता त्यांनी नाममात्र गुन्हे दाखल करुन प्रकरण निपटण्याचा प्रयत्न करीत आहे मात्र पत्रकार महम्मद तौसिफ मो. शफीक यांना लागलेला मार गंभीर स्वरुपाचा असल्यामुळे व ते स्वतः एक पत्रकार असल्यामुळे संबंधीत दोषींवर त्यांचे तक्रारीनुसार पत्रकार संरक्षण कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल होवुन इतर नियमानुसार गुन्हे दाखल करून सर्व आरोपींना तात्काळ अटक करुन पत्रकार महम्मद तौसिफ मो. शफीक यांना न्याय दयावा अशी मागणी शासन मान्य पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.सदर निवेदनावर,मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत बर्दे,शासनमान्य पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम बोर्डे,इसरार देशमुख,संजय गवई, कमलेश हिवाळे,असीम मिर्झा,रमेश खंडारे, आत्माराम चौरे,सै असद,मो मुफियान,शेख आबीद,शेख कलीम गोपाल शिराळे,यांच्यासह शासनमान्य पत्रकार संरक्षण समितीचे सदस्यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post