ढोकणे हॉस्पिटलचे नूतन वास्तुत स्थानांतरण
श्रीमती प्रमिला देविदास ढोकणे यांच्या हस्ते उद्घाटन
खामगाव- (जनोपचार) :-गत 6 वर्षापासून खामगाव शहरात 24 तास रुग्णसेवेत कार्यरत असलेले स्त्रीरोगतज्ञ तथा सर्व परिचित,तसेच अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे डॉ. आश्विन ढोकणे व त्यांच्या पत्नी डॉ. सौ. पूजा आश्विन ढोकणे यांच्या ढोकणे हॉस्पिटलचे जलंब रोडवरील नाना- नानी पार्कच्या मागे नूतन वास्तूत स्थानांतरण करण्यात आले.
जाहिरात👆👆👆👆साठी संपर्क 8208819438
सदर ढोकणे हॉस्पीटल व प्रसुतीगृहाचे तसेच डॉ. ढोकणे यांच्या नविन घराच्या गृहप्रवेश सोहळ्याचे उद्घाटन डॉ. आश्विन ढोकणे यांच्या आई श्रीमती प्रमिला देविदास ढोकणे यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला डॉ.आश्विन ढोकणे, डॉ.पूजा ढोकणे,सागर फुंडकर, डॉ. हर्षल इंगोले, डॉ. रोहिणी इंगोले नागपूर, प्रकाश ढोकणे,डॉ. नारायण केडिया, डॉ. सत्यजित ओक,डॉ.अंजु ओक,डॉ.प्रदीप राठी, डॉ. किरण राठी, डॉ. गुरुप्रसाद थेटे, डॉ.गणेश महाले यांच्या सह शहरातील सर्व डॉक्टर्स व प्रतिष्ठीत नागरिकांची उपस्थिती होती. तसेच या सोहळयाला शहरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर सुध्दा प्रामुख्याने उपस्थित होते. या अद्यावत हॉस्पिलमुळे खामगांव शहराच्या आरोग्य सेवेत आणखी भर पडली आहे.
Post a Comment