अंगणवाडी सेविकांच्या मागण्या अधिवेशनात मांडणार –आ.ॲड.आकाश फुंडकर

 अंगणवाडी सेविकांच्या वतीने आमदार फुंडकर यांना दिले मागण्यांचा निवेदन

अंगणवाडी सेविकांच्या मागण्या अधिवेशनात मांडणार –आ.ॲड.आकाश फुंडकर



खामगांव (जणोपचार):- महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियन संघटनेच्या वतीने आज 12 डिसेंबर 2022 रोजी आमदार एड.आकाश फुंडकर यांच्याशी त्यांच्या कार्यालयात सविस्तर चर्चा करून आमदार एड आकाश फुंडकर यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात या मागण्या मांडाव्यात यासाठी निवेदन सादर केले. यावेळी बोलतांना आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी सदरच्या मागण्या अधिवेशनात मांडणार असल्याचे आश्वासन दिले.

अंगणवाडी सेविकांवर कामाचा ताण वाढला आहे. महिला व बालकल्याण विभागाचे वरिष्ठ अधिकारी वस्तीपाळी वरील व अंगणवाडी स्तरावरील  प्रश्ना बाबत विचार करीत नसून कर्मचाऱ्यावर दबावतंत्राच्या वापर करीत आहे .गेल्या ५ वर्षांपासून शासनाने कर्मचाऱ्यांच्या मानधनात काहीच वाढ केलेली नाही. देशातील अनेक राज्य सरकारे महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त मानधन अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना देतात.



अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना निकृष्ट दर्जाचे मोबाईल दिले जातात.  चुकीचे पोषण ट्रॅकरअप , थकीत टि ए डि ए , निकृष्ट दर्जाचे पोषण आहार, अंगणवाड्याचे महिनो महिने थकीत  घर भाडे , रिक्त जागांची व सुपरवायझरच्या रिकाम्या जागाची भरती न करणे , व इतर प्रश्न अनेक गेल्या वर्षापासून प्रलंबित आहेत वरील सर्व मागण्या प्रलंबित आहेत, यावेळी आमदार आकाश फुंडकर यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या शिष्टमंडळाने अंगणवाडी गटाशी सविस्तर चर्चा करून आपल्या सर्व मागण्या  रास्त असल्याचे सांगितले, या मागण्या मी नागपूर हिवाळी अधिवेशनात ठेवणार असल्याचे आश्वासन दिले तसेच इथे जर प्रश्न सोडवले गेले नाही तर या मागण्याला मी मंत्रालय मुंबई येथे  ठेवण्याचे आश्वासनही दिले आहे.

यावेळी खामगाव शहरी विभागातील अंगणवाडी सेविका वर्षा दिवरे, इशरत सुलताना, ज्योती सवंग, खामगाव ग्रामीण विभागातील जयमाला टिकर, अनिता तेलंग, शेगाव ग्रामीणच्या मालती भारद्वाज, राजश्री अहिर आदीसह शेकडो अंगणवाडी सेविका. व मदतनीस उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post