श्री संत संताजी महाराज भव्य सभागृहाचे थाटात लोकार्पण संपन्न ; सभागृहांचा उपयोग समाजातील तरुणांकरिता स्पर्धेच्या युगात मार्गदर्शन केंद्र म्हणून करावा- आ.आकाश फुंडकर
खामगाव (जनोपचार):-खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाशदादा फुंडकर यांनी मागील 7 वर्षापासूनच्या आपल्या कार्यकाळात खामगांव विधानसभा मतदार संघात विविध समाजांसाठी सामाजिक सभागृह उभे केले आहेत. यांतर्गत काल दि.11 डिसेंबर 2022 रोजी तेली समाजासाठी रु 72 लक्ष रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या सभागृहाचे लोकार्पण प्रसंगी आमदार ॲड आकाशदादा फुंडकर बोलत होते.
जाहिरात👆👆संपर्क 8208819438खामगांव शहरातील भिसे प्लॉट भागात आमदार आकाश दादा फुंडकर फुंडकर यांच्या मार्गदर्शनात रु. 72 लाख खर्च करुन बांधण्यात आलेल्या भव्य़ सभागृहाचे लोकार्पण दि.11 डिेसेबर 2022 रोजी खामगाव तेली समाज अध्यक्ष राजेशजी झापर्डे व खामगाव निवासी सर्व तेली समाज यांचे प्रमुख उपस्थितीत थाटात संपन्ऩ झाला.
संत वचनाप्रमाणे सन्माननीय आमदार आकाश दादा फुंडकर यांनी भरीव निधी व विशेष सहकार्य करून खामगाव येथे तेली समाज भावनांची बहुप्रतिक्षित अशी मनोकामना पूर्ण झाल्याबद्दल सन्माननीय आमदार आकाश दादा फुंडकर यांचा जाहीर सत्कार केला तसेच तेली समाजातील सर्व सन्माननीय सदस्य ज्यांचे या कार्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष साथ मिळाली त्यांचे देखील समाजातर्फे जाहीर आभार मानले.
तेली समाजाकरीता नव्याने बांधण्यात आलेल्या पूजनीय श्री संत संताजी महाराज सभागृहाचे लोकार्पण केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना हे सभागृह केवळ लग्न, वाढदिवस असे कार्यक्रमा व्यतिरिक्त समाजातील तरुणांकरिता विविध मार्गदर्शन केंद्र सुरू करावे जेणेकरून या स्पर्धेच्या युगात आपले तरुण तयार होऊन त्यांना रोजगाराच्या चांगल्या संधी कश्या मिळतील याची माहितीही मिळेल आणि ते सक्षम बनतील. समाजातील सर्व समस्या सोडविण्याचा पूर्ण प्रयत्न करेल असेही आमदार ॲड.आकाशदादा फुंडकर यावेळी म्हणाले
आदरणीय आमदार आकाश दादा फुंडकर जिल्हा अध्यक्ष भाजपा यांच्या शुभहस्ते संपन्न.कार्यकामाचे अध्यक्ष समाज भूषण श्री राजेश जी झापर्डे तेली समाज पंच मंडळ अध्यक्ष खामगांव, प्रमुख उपस्थीती सर्व श्री ह भ प चोपडे महाराज, अनंत राव निळे साहेब,विजय राव आकोटकर , रोठे साहेब, डॉ आकाश खेळकर वरील सर्व मान्यवरांचे समाज च्या वतिने भव्य स्वागत करण्यात आले.आ.आकाश दादा फुंडकर,चोपडे महाराज,व राजेश भाऊ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्र संचालन निळकंठ भाऊ सोनटक्के,प्रस्तावीक श्री गणेश भाऊ खेडकर पंच मंडळ सचिव, आभार प्रदर्शन श्री बेलोकार सर यांनी केले.बहु संख्यने समाज बांधव व माता भगीणी युवक उपस्थित होते.फाटे साहेब ,पंकज गमे ,सितल राठोड , अमोल राठोड , श्रीकांत चोपडे ,संतोष ढवले, विनोद वरुळकार सुधिर गोतमारे,रवि दिपके, गोवर्धन खेळकर,वामन भगत यांचेसह तेली समाजाचे सर्व पंच मंडळ व समाज बांधव भगिनी उपस्थित होते.
Post a Comment