भूमिहीन व अतिक्रमणधारकांच्या पाठीशी वंचीत बहुजन आघाडीl अतिक्रमण धारकांनी संपर्क साधावा ; जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांचे आवाहन
खामगांव प्रतिनिधी: गायरान व शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढण्या संबधीची कार्यवाही राज्यात सूरू झाली असून ज्या अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढण्यासाठी नोटिसा आल्या आहेत अशा अतिक्रमण धारकांनी वंचीत बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांनी केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ६ ऑक्टोबर २०२२ रोजी दिलेल्या निर्णयानुसार राज्यभरातील सहा महसूल विभागातील ३५८ तालुक्यातील गायरान शासकीय जमिनीवरील अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण काढणे संबंधीची कार्यवाही महाराष्ट्रात सुरू झाली असून याच कारवाईचे आदेश देणाऱ्या नोटिसा अतिक्रमण धारकांना खामगांव तहसीलदार व नगर परिषदच्या वतीने जागा खाली करण्यासाठी देण्यात आल्या आहेत. अतिक्रमण काढण्यासाठी पंधरा दिवसाचा कालावधी दिला आहे. सदर अतिक्रमण धारक हे मागील अनेक पिढ्यांपासून त्या ठिकाणी राहतात यातील 70% अतिक्रमण धारक आपल्या कुटुंबासोबत राहात असून रहिवासासाठी ती जागा वापरत आहेत. तसेच हे सर्व अनुसूचित जाती - जमाती, अल्पसंख्यांक, भटके विमुक्त मायक्रो ओबीसी या प्रवर्गातील आहेत भूमिहीन कामगार मजूर वर्गातील आहेत. सर्व खामगांव शहरासह तालुक्यात या नोटीसा आल्यामुळे लोक ही समस्या सोडविण्यासाठी अडचणी येत होत्या. या अडचणीचे निवारण करण्यासाठी
वंचित बहुजन आघाडी तर्फे वंचित बहुजन वर्गातील शासकीय / गायरान अतिक्रमित जमिनीवर ज्यांची घरे आहेत अश्या अतिक्रमण धारकांसाठी जमीन नावावर होण्याचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. वंचित बहुजन आघाडी पार्लमेंट बोर्ड सदस्य तथा भारिप बहुजन महासंघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक भाऊ सोनोने यांच्या तर्फे आवाहन करण्यात येते की, गायरान शासकीय जमिनीवरील अतिक्रमण धारकांनी जास्तीत जास्त संख्येने सदरचा अर्ज भरण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे 8888208330 , माजी तालुकाध्यक्ष संघपाल जाधव,9503544506 कृ.उ बाजार समिती माजी संचालक राजेश शेलोडे 9922476664, तालुकाध्यक्ष प्रभाकरजी वरखेडे 9970705565, खामगाव शहराध्यक्ष धम्मपाल नितनवरे 9604287215, शहर उपाध्यक्ष हर्षवर्धन खंडारे 9975777208,शहर मुख्य संघटक अमन हेलोडे 9552666491, महिला जिल्हाध्यक्ष विशाखाताई सावंग 9922459895, युवक तालुकाध्यक्ष अमोल शेगोकार 8668759374 यांच्याशी संपर्क करावा किंवा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयावरती येऊन सदर अर्ज भरावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment