काशीराम वाघमारे यांना क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
खामगाव :- लाखनवाडा येथील रहिवासी असलेले व सध्या जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा बोरीअडगाव येथे कार्यरत असलेले काशीराम वाघमारे यांना परिवर्तन सामाजिक संस्था पुणे व जगदिशब्द फाउंडेशन च्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार(राज्यस्तरीय) आज दि 27 नोव्हेंबर 2022 रोजीपुणे येथे प्रदान करण्यात आला
यावेळी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी होते तर प्रसिद्ध समाजसेवक तृतीयपंथी साठी काम करणाऱ्या दिशा पिंकी शेख व भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई संपादक श्रीरंग गायकवाड मुंबई हायकोर्टाचे जेष्ठ वकील विजयजी कुरले उपस्थित होते काशीराम वाघमारे हे साहित्यामध्ये अमरावती विद्यापीठामध्ये पीएचडी करत असून ते साहित्यिक आहेत पुरस्कार देताना संस्थेने वाघमारे यांचे आतापर्यंतचे सामाजिक शैक्षणिक व साहित्यातील कार्य लक्षात घेतले आहे ते शाहू फुले आंबेडकर तसे बहुजनवादी विचारधारा शिरोबिंदू माणून मानवतावादी चळवळीत सक्रिय सहभागी आहेत या पुरस्काराचे स्वरूप राज्यस्तरीय असून शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन त्यांना महात्मा फुले सांस्कृतिक सभागृह महानगर पालिका पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त 27 नोव्हेंबर ला सन्मानित करण्यात आला. खरा शिक्षक दिन हा महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन आहे त्यांनी केलेले शैक्षणिक कार्य हे या भारत देशाला नवीन दिशा देणार आहे खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले या देशाचे राष्ट्रपिता आहेत आणि म्हणून त्यांचा स्मृतिदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात यावा आणि त्यांच्या स्मृतिदिनी महाराष्ट्रातील मोजक्या बहुजनवादी चळवळीतील शिक्षकांना आदर्श पुरस्कार देऊन त्यांचा कार्याचा गौरव करण्यात आला. या उद्देशाने 'लोकहितासाठी परिवर्तन चळवळ' हे ब्रीद घेऊन ही परिवर्तनवादी सामाजिक संस्था पुणे व महाराष्ट्रभर कार्य करत आहे. बहुजन विचाराचे पाईक म्हणूनआदर्श शिक्षकांचा गौरव केला त्यासाठी काशीराम वाघमारे यांचे सामाजिक साहित्य तथा शैक्षणिक कार्य लक्षात घेता त्यांना हा पुरस्कार पुणे येथे नुकताच प्रदान करण्यात आला यावेळी पुढील पिढी सक्षम रीतीने तयार होईल असे कार्य शिक्षकांनी केले आहे त्यांनी असे कार्य पुढेही करावे त्यामुळे शेतकऱ्यांची भावी पिढी समृद्ध होईल असे खासदार राजू शेट्टी म्हणाले यावेळी शिक्षकांना प्रगल्भ असाव्यात त्यामुळे सुंदर राष्ट्र निर्माण होईल व त्या जाणीव पुरस्कार प्राप्त शिक्षकात आहेतअसे उदगार दिशा पिंकी शेख यांनी काढले*
Nice
ReplyDeletePost a Comment