पोलिस व्हायचे स्वप्न पाहताय ?
अर्ज भरला का.? तुम्हाला माहित आहे का! १५ दिवस वाढले !
खामगाव (जनोपचार)- राज्य
सरकारच्या पोलिस भरती प्रकियेत ऑनलाइन अर्ज
करण्यासाठी आता १५ दिवस वाढल्याची खुश खबर येतेय! त्यामुळे आता अर्ज भरण्यासाठी
ऑनलाईन सेंटर गर्दी टाळा!
सर्व्हर सातत्याने हँग होत असल्याने रात्र-रात्र जागून
उमेदवारांना अर्ज भरावा लागत आहे. त्यामुळे भावी
पोलिसांना आतापासूनच नाईट ड्यूटीची सवय
करावी लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.त्यामुळेही मुदत वाढविल्याचे समजते.
राज्य सरकारने पोलिस शिपाई १४ हजार ९५६ जागा,
पोलिस चालक २१७४ जागा व राज्य राखीव दल १२०१
जागा या तीन विभागांमध्ये भरती प्रक्रिया सुरू केली आहे.
यातील बुलडाणा जिल्ह्यात ५१ पोलिस शिपाई पदासाठी
भरती प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे तरुणांनी तयारी
सुरू केली आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर होती त्यामुळे युवक सेतू केंद्रावर अर्ज भरण्यासाठी गर्दी
करीत आहेत. मात्र, पोलिस भरतीसाठी असलेले
ऑनलाइन संकेतस्थळ सतत डाउन होत असल्याने
युवकांना रात्री तीन ते साडेतीन वाजेपर्यंत जागून अर्ज
भरण्याची प्रक्रिया करावी लागत असल्याचे दिसून येते
Post a Comment