श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने श्री गुरू नानक जयंती व दीपोत्सव साजरा
खामगाव (जनोपचार)😊स्थानिक सतिफैल भागातील श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा ८ व ९ नोव्हेंबर रोजी श्री गुरू नानक देव जयंती व कार्तिक पौर्णिमा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास ऊर्फ मुन्ना भाऊ शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मागील २२ वर्षा पासून मंडळाच्या माध्यमातून धार्मिक व अनेक सामाजिक उपक्रम निस्वार्थ अखंडपणे सुरू आहेत या मध्ये दिं ८-१०-२०२२ मंगळ वार रोजी संध्याकाळी ७ वा ओंकारेश्वर मठ येथे महाआरती करून श्री गुरू नानक देव जयंती साजरी करण्यात आली नंतर भव्य दिव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. दिं ९-१०-२०२२ बुधवार रोजी सकाळी १० ते ११-३० भजन.व महाआरती करून दुपारी १२ ते ३ महाप्रसाद वाटप करून काकडा आरती व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी माजी आमदार नाना भाऊ कोकरे. माजी नगराध्यक्ष गणेश भाऊ माने. रमेश काका सरोदे. कल्याण भाऊ गलांडे.कैलास मिश्रा.शिवाजी पाटील जि अध्यक्ष.मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा. विनोद सुकाळे. दिलीप झापर्डे. अरूण कडवकर.लक्ष्मणराव गाडे. लालाजी सांगळे.गजानन बागल. अशोक आनंदे. श्याम आंबेकर..अशोक मोरे. सागर चुंबळकर.राजु इंगळे. विनोद महाडिक.सागर ठाकुर. प्रमोद गायकवाड.गोपाल ठाकुर. विनोद ढवळे. स्वराज सुकाळे.नितिन येळणे.जसबिरसिंग चव्हाण.गोविंद जुनारे.विजय गायकवाड.भागीरथी बाई शेळके. सुशिला बाई आवलकर. आशाबाई अंधारे. मंगला बाई बावस्कर. जयाबाई सुकाळे. ईन्दुबाई गायकवाड. पार्वती बाई सुकाळे. मुन्नी बाई चव्हाण. संगीताबाई वाघोळे.पुष्पा बाई पवार. शकुंतला बाई ढवळे. जयश्री झापर्डे.पुष्पाबाई . सरोदे. गुड्डी ताई पवार. शालिनीताई देशमुख, वर्षाताई देशमुख पुष्पा बाई गिड्डे तसेच शिवाजी नगर. सतिफैल भागातील शेकडो महिला पुरूषांची उपस्थिती होती अशी माहिती श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली.
Post a Comment