*मानसीताई दळवी, राजाभाई केणी यांचा जिल्हा रुग्णालयावर हल्लाबोल*
शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांचा कुचकामी कारभार
गडब / अवंतिका म्हात्रे
अलिबाग येथील जिल्हारुग्णालयात मागील सात महिन्यात ४९ बालके दगावली आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर संताप व्यक्त करत (बाळासाहेबांची) शिवसेनेच्या नेत्या मानसी दळवी, जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी हल्लाबोल करत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांना जाब विचारला. जिल्हा रुग्णालयचा बाजार मांडला असून येथील अधिकारीच खासगी रुग्णालये काढून बसलेलेत. यामुळे जिल्हा रुग्णालयाकडे अधिकाऱ्यांचेच दुर्लक्ष होत चालले असताना या विकृत डॉक्टरी पेशामुळे नवजात बालकांना डोळे न उघडताच हे जग सोडावे लागत आहे. या अनागोंदी कारभाराबद्दल आरोग्य
विभागाचे वेळेत डोळे न उघडल्यास आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही मानसी दळवी यांनी दिला आहे.
जिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या तीन महिलांची प्रसुती व्यवस्थित झाली; परंतु काही वेळातच त्यांचे बाळ दगावल्याने जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबद्दल या मृतमुखी पडलेल्या बालकांच्या पालकांचा आक्रोष वाढला होता. मात्र, त्यांची दखल घेण्यास कोणीही पुढे आले नाही. अखेर या बालकांच्या पालकांनी शिवसेनेच्या नेत्या मानसी दळवी आणि जिल्हा प्रमुख राजा केणी यांची भेट घेतल्यानंतर या दोघांनीही रुग्णालयात सकाळी धाव घेतली. यावेळी प्रसुती कक्षातील आरोग्य व्यवस्था पाहून शासनाकडून इतक्या मोठ्या प्रमाणात केला जाणारा पैसा व्यर्थ जात असल्याल्याबद्दल संताप व्यक्त केला. येथे जिल्हाभरातून दिवसाला १५० च्या आसपास महिला प्रसुतीसाठी आलेल्या असतात; परंतु त्यांच्यावर वैद्यकिय उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरच नसतात. कंत्राट बेसीसवरील परिचारीकांवर जबाबदारी सोपवूनया विभागाच्या नव्यानेच नियुक्तीवर असलेल्या तीनही महिला डॉक्टर निघून जातात. या महिला डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ प्रसुती तज्ज्ञ डॉ. अनिल फुटाणे यांची नियुक्ती शल्यचिकिस्तकांनी कंत्राटी स्वरुपात केलेली आहे. परंतु ते देखील आपल्या खासगी रुग्णालयाच्या कारभारामुळे येथे वेळ देऊ शकत नाही, अशीबिकट परिस्थिती जिल्हा रुग्णालयात निर्माण झाली आहे. त्याचबरोबर रुग्णालयाची इमारतही जिल्हा रुग्णालयाची इतकी नादुरुस्त झालेली आहे, की ती केव्हाही कोसळून पडेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. इतर वॉर्डमध्येही असाच अनागोंदी कारभार असून तरीही जिल्हा शल्यचिकित्सक कोणताही ठोस घेत नाहीत. दिवसेंदिवस या ग्णालयाचा कारभारच गचाळ होत असल्याचा आरोप मानसी दळवी यांनी केला असून यास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने हे जबाबदार असल्याचे म्हणणे दळवी यांचे आहे. या कारभारात वेळेतच सुधारणा न झाल्यास आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. असाही इशारा मानसी दळवी, राजा केणी यांनी दिला आहे.
Post a Comment