🔺शेगाव च्या तरुणीने चिठ्ठी लिहून घेतला अखेरचा श्र्वास
खामगाव:-(जनोपचार द रियल न्यूज) लग्नात फोटोग्राफरशी ओळख झाली ..हळू हळू वर्ष जात गेली मात्र अचानक तरुणीने एक चिट्ठी लिहून जीवन यात्रा संपविली. ही घटना शेगाव येथे 6 नोव्हेम्बर ला घडली असून नेमक झालं तरी काय ? की तरुणीला टोकाचे पाऊल उचलावे लागले याचा उलगडा पोलीस लावणारच आहे
या बाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार आरोपी हा फोटोग्राफर असून लग्नात मृतक (रिद्धी काल्पनिक नाव)व आरोपी यांची ओळख झाली होती दरम्यान आरोपी याने मृतक हिला सन 2018 पासून मानसिक त्रास दिला असे मजकूर मृतक तरुणीने मृत्यूपूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवला व राहते घरी खोलीमध्ये पंख्याला ओढणीचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतकतरुणीच्या मृत्यू ला आरोपी हाच जबाबदार असून आरोपी यांनी फिर्यादीच्या मुलीला मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले आहे. अशी फिर्याद शेगाव पोलीसनी दाखल करून आरोपीला शोधायची प्रक्रिया सुरू केली आहे ,तपास अधिकारी पी एस आय नितीन इंगोले यांच्याशी जनोपचार ने संपर्क केला असता त्यांनी लवकरच आरोपीला अटक करुण मृतकला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे म्हटले आहे
Post a Comment