एचआयव्ही एड्स, स्त्रियांचे आरोग्यविषयक प्रश्न, बेटी बचाओ बेटी पढाओ व पर्यावरण जनजागृती साठी सायकल संवाद यात्रा :या तारखेला तुमच्या गावात
खामगाव(नितेश मानकर):-
पाडवा व भाऊबीज च्या दुसऱ्या दिवशी पहाटे डॉ पवन सत्यनारायण चांडक व नितीन शेवलकर हे परभणी - लोणार- मेहकर - शेगाव - खामगाव - जळगाव - धुळे - नाशिक - नारायणगाव - पुणे - या मार्गातून स्वच्छंदपणे सायकलिंग करत वाटेत विविध सामाजिक संस्था, अनाथाश्रम, आश्रमशाळा, रुग्णालये, विविध सोशल ग्रुप, तीर्थक्षेत्र आदींना भेट देत मुंबई येथे सायकल यात्रेचा समारोप करतील.
या मोहिमेत ते सर्वसामान्य लोकांमध्ये एचआयव्ही एड्स विषयी जनजागृती सोबत एड्सग्रस्त रुग्णांचे मूलभूत प्रश्नांवर जनजागृती करून सर्वसामान्य व शासनाचे लक्ष वेधनार आहेत. तसेच स्त्रियांचे आरोग्यविषयक प्रश्न जसे मासिक पाळी व्यवस्थापन तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ व सायकलिंग मधून इंधन बचाओ चा संदेश देत पर्यावरण जनजागृती चा संदेश देणार आहेत.
तरी या सायकल मार्गावर आपण आपापल्या परीने सहयोग द्यावा ही नम्र विनंती.
27 ऑक्टोबर: परभणी - जिंतूर - येलदरी - लोणार 128 km
28 ऑक्टोबर: लोणार - मेहकर - शेगाव - खामगाव 136 km
29 ऑक्टोबर: खामगाव - मुक्ताईनगर - भुसावळ - जळगाव 126 km
30 ऑक्टोबर: जळगाव - अमळनेर - धुळे - मालेगाव 145 किमी
31 ऑक्टोबर: मालेगाव - चांदवड - नाशिक 106 किमी
1 नोव्हेंबर: नाशिक - सिन्नर - संगमनेर -आळेफाटा - नारायणगाव 136 km
2 नोव्हेंबर नारायणगाव - मंचर - चाकण - पुणे - देहू - कामशेत 123 km
3 नोव्हेंबर: कामशेत - लोणावळा - खालापूर - मुंबई 129 km
यात धुळे नंतर चे अंतर 20 - 25 किमी आधी होऊन 1 नोव्हेंबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान नाशिक, पुणे व मुंबई दरम्यान मुक्काम चे ठिकाण बदलू शकते.4 नोव्हेंबर ला मुंबईत सर्व सामाजिक ग्रुप ला भेट घेऊन सायंकाळी देवगिरी एक्सप्रेस ट्रेन ने परतीचा प्रवास
👉🏿 होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) तर्फे परभणी जिल्ह्यातील 330 एचआयव्ही संक्रमित अनाथ, एकल पालक व दुर्धर आजारग्रस्त बालकांच्या मूलभूत प्रश्नावर जसे शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन तसेच निराधार एड्सग्रस्त विधवा महिलांच्या विविध स्वयंरोजगार व प्रशिक्षण माध्यमातून सक्षमीकरण चे कार्य सुरू आहे। मागील 4 वर्षांपासून परभणी, हिंगोली, बीड व वाशीम जिल्ह्यातील ग्रामीण भागातील किशोरवयीन मुली व महिलांमध्ये 'मासिक पाळी व्यवस्थापन' कार्यशाळेचे आयोजन करून किशोरवयीन मुलींच्या व स्त्रियांच्या आरोग्यविषयक प्रश्नांवर जनजागृती व समुपदेशन चे कार्य सुरू आहे. तसेच महाराष्ट्रातील एड्स ग्रस्त मुलांसाठी असलेल्या विशेष बालगृह जसे सेवालय प्रकल्प हसेगाव लातूर, इंफॅन्ट इंडिया बीड, पालवी पंढरपूर व सूर्योदय बालगृह अकोला येथील मुलांना गरजेनुसार वेळोवेळी मदत दिली जाते. एचएआरसी संस्था कोणतेही शासकीय मदत न घेता मागील 13 वर्षा पासून केवळ लोकसहभागातून मिळणाऱ्या मदतीवर कार्य करते.
👉🏿 या पूर्वी 2013 पासून ते 2022 दरम्यान एचआयव्ही एड्स जनजागृती सोबत एचआयव्ही संक्रमित बालकांच्या मूलभूत प्रश्न जसे शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन विषयी सर्वसामान्यांमध्ये सायकलिंग मोहिमेतून संवाद साधून आजवर 83,000 पेक्षा जास्त किमी सायकलिंग भारतातील 11 राज्य - महाराष्ट्र, गुजरात, गोवा, राजस्थान, पंजाब, हरयाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि 4 देश ज्यात इंग्लंड, स्कॉटलंड, जर्मनी, फ्रांस आदी भागात आजवर केली आहे. अशी माहिती सामान्य रुग्णालय खामगाव चे समुपदेशक संतोष दारमोडे यांनी जनोपचार ला दिली
Post a Comment